Mobile Interesting Facts : मोबाईलचा Wallpaper बदलला की बॅटरीवर परिणाम होतो का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Wallpaper Effect on Battery : मोबाईल वॉलपेपरचा परिणाम बॅटरीवर होतो का? हा प्रश्न साधा असला तरी त्यामागे स्क्रीन टेक्नॉलॉजी, जीपीयू वापर, रंगांचे गुणधर्म आणि अॅनिमेशन यांसारखे अनेक तांत्रिक मुद्दे आहेत.
स्मार्टफोन वापरताना आपण सगळ्यात जास्त पाहतो ती गोष्ट म्हणजे फोनचा स्क्रीन. स्क्रीनवर दिसणारा वॉलपेपर फोनला आकर्षक बनवतोच, पण अनेकांना असा प्रश्न पडतो की वॉलपेपर बदलल्याने बॅटरीवर काही परिणाम होतो का? हा प्रश्न साधा असला तरी त्यामागे स्क्रीन टेक्नॉलॉजी, जीपीयू वापर, रंगांचे गुणधर्म आणि अ‍ॅनिमेशन यांसारखे अनेक तांत्रिक मुद्दे आहेत.
advertisement
स्टॅटिक म्हणजे साधा फोटो असलेला वॉलपेपर फक्त स्क्रिनवर दिसतो. तो दर क्षणी कोणतंही नवीन काम करत नाहीत, जीपीयू पुन्हा पुन्हा प्रोसेस करत नाही, म्हणून ते बॅटरीवर खूपच कमी परिणाम करतात. असे वॉलपेपर वापरल्याने बॅटरीवर थेट येत नाही. यावेळी बॅटरी मुख्यत्वे स्क्रीन ब्राइटनेस आणि अ‍ॅप वापरामुळे कमी होते, वॉलपेपरमुळे नाही.
advertisement
लाइव्ह आणि एनिमेटेड वॉलपेपर बॅटरीचे सर्वात मोठे शत्रू लाइव्ह वॉलपेपर म्हणजे हलणारे, एनिमेटेड किंवा 3डी ग्राफिक्स असलेले बॅकग्राऊंड आकर्षक असलेले तरी बॅटरीचा खूप वापर करतात. लाइव्ह वॉलपेपरमध्ये स्क्रीनवर सतत फ्रेम्स रेंडर होतात. जीपीयू आणि सीपीयू सतत एक्टिव्ह राहतात. काहींमध्ये सेंसर्स वापरले जातात अ‍ॅनिमेशनमुळे रॅमचा वापरही वाढतो. परिणामी बॅटरी 10% ते 25% अधिक खर्च होऊ शकते, विशेषतः 90Hz, 120Hz सारख्या हाय फ्रेश रेट स्क्रीनमध्ये.
advertisement
LCD आणि OLED किंवा AMOLED या दोन तंत्रज्ञानात मोठा फरक आहे. OLED मध्ये प्रत्येक पिक्सेल स्वतंत्रपणे प्रकाश देतो. त्यामुळे काळ्या रंगात तो पिक्सेल पूर्णपणे बंद राहतो, म्हणजेच शून्य वीज वापरतो. काळा किंवा गडद रंगाचा वॉलपेपर वापरल्यास अनेक पिक्सेल बंद राहतात त्यामुळे पॉवर वापर खरोखरच कमी होतो. परिणामी बॅटरी लाईफमध्ये सुधारणा होते.
advertisement
advertisement
LCD स्क्रीनमध्ये वॉलपेपरचा फारसा फरक पडत नाही. एलसीडी स्क्रीनमध्ये एक बॅकलाइट असते जी कायम चालू असते. म्हणून स्क्रीनवर काळा रंग असो किंवा पांढरा रंग, बॅकलाइट बंद होत नाही. काळा वॉलपेपर आणि पांढरा वॉलपेपर बॅटरी समानच खर्च करतात. फरक जवळजवळ नगण्य असतो LCD फोन वापरणाऱ्यांनी वॉलपेपरबाबत बॅटरीची चिंता करण्याची गरज नाही.
advertisement
advertisement
एकंदर काय तर एकंदर काय मोबाइलच्या वॉलपेपर बदलल्याने बॅटरीवर परिणाम होतो, पण तो परिणाम वॉलपेपरचा प्रकार आणि स्क्रीनची टेक्नॉलॉजी यावर अवलंबून असतो. स्टॅटिक वॉलपेपरचा बॅटरीवर खूप कमी परिणाम होतो. डार्क वॉलपेपर चांगली बॅटरी बचत करतात, लाइट वॉलपेपर थोडा जास्त वापर करतात, एलसीडीमध्ये कोणत्याही वॉलपेपरचा फरक पडत नाही. लाइव्ह किंवा एनिमेटेड वॉलपेपरला सर्वाधिक बॅटरी खर्च होते.
advertisement






