Temple : या मंदिरात जो गेला तो परत आलाच नाही; म्हणतात, 'नरकाचं द्वार', रहस्य काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mysterious Temple : अनेक लोकांनी या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. म्हणूनच सरकारने लोकांना या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे.
advertisement
असं मानलं जातं की या मंदिरात एक माणूस राहत होता, ज्याची नंतर हत्या करण्यात आली. इतर दंतकथांनुसार, ग्रीक देवता या मंदिरात राहतात. जेव्हा जेव्हा एखादा मानव किंवा प्राणी आत प्रवेश करतो तेव्हा ते श्वास सोडतात, ज्यामुळे द्वारावरील कुणाचाही मृत्यू होतो. लोक याला दैवी शक्ती किंवा शाप समजत होते. पुजारी या गूढतेचा वापर धार्मिक हेतूंसाठी करत असत. ते प्राण्यांना गुहेत सोडत असत आणि जेव्हा ते मरत असत तेव्हा ते त्याला चमत्कार घोषित करत असत, ज्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होत असे.
advertisement
मंदिरातील पुजाऱ्याचाही इथंच मृत्यू झाला. जर्मनीतील ड्यूसबर्ग-एसेन विद्यापीठातील ज्वालामुखीशास्त्रज्ञ हार्डी फांझ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एक सविस्तर अभ्यास केला. मंदिराबाहेरील एक दगडी दरवाजा एका लहान गुहेत जातो. हा दरवाजा आयताकृती जागेत बांधलेला आहे. इतिहासकार म्हणतात की या गुहेच्या वर एकेकाळी एक मंदिर होतं. आजूबाजूला दगड आहेत, जिथं लोक येत असत आणि वेळ घालवत असत. सुमारे 2200 वर्षांपूर्वी, येथील गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये चमत्कारिक शक्ती होती, ज्यामुळे आजार बरे होत होते. म्हणूनच मोठ्या संख्येने लोक या झऱ्यांमध्ये स्नान करण्यासाठी या ठिकाणी येत असत.
advertisement
नंतर या मंदिराच्या खाली एक खोल भेग निर्माण झाली होती, ज्यामुळे ज्वालामुखीतून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होत होता. हा वायू इतका मुबलक होता की तो धुक्यासारखा दिसत होता. नरकाचे दरवाजे म्हणून ओळखले जाणारे हे द्वार या जागेच्या अगदी वर आहे. ही गुहा एका सक्रिय ज्वालामुखी प्रदेशावर आहे, जी मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड (CO₂) उत्सर्जित करते. हवेपेक्षा जास्त घनता असल्याने हा वायू जमिनीजवळ जमा होतो.
advertisement
संशोधनानुसार रात्री आणि पहाटे या वायूचा प्रभाव सर्वात जास्त असतो. दिवसा सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे वायूचं किंचित बाष्पीभवन होतं. संधोधकांना आढळलं की दिवसा सूर्याची उष्णता वायूचे विघटन करतं, पण रात्री आणि पहाटेच्या वेळी हा वायू अत्यंत विषारी बनतो. जमिनीपासून 40 सेंटीमीटर उंचीपर्यंत त्याचे परिणाम घातक असतात. पुजाऱ्याचा मृत्यू याच कारणामुळे झाला असावा असा संघाचा विश्वास आहे.
advertisement
आता हे मंदिर आहे कुठे? तर तुर्कीमध्ये प्राचीन शहर हिएरापोलिसमध्ये आहे. हे ठिकाण प्रत्यक्षात रोमन काळातील एक गुहा आहे. हे मंदिर गेट टू हेल किंवा प्लूटोचं गेट म्हणूनही ओळखलं जातं. प्राचीन धार्मिक श्रद्धेनुसार हे ठिकाण पाताळातील देव प्लूटोला समर्पित होतं आणि तिथं यज्ञ केलं जात होते. प्राचीन काळची ही गुहा मृत्यूचं प्रतीक मानली जात असे. ही गुहा इतकी धोकादायक मानली जात होती की तिथे गेलेला कोणताही सजीव काही मिनिटांतच मरत असे. यामुळे त्याचं नाव नरकाचं द्वार पडलं.
advertisement
आज जेव्हा विज्ञानाने सत्य उघड केल आहे, तेव्हा हे स्पष्ट झालं आहे की हे सर्व वायूमुळे झालं आहे. जरी हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय असलं तरी ते एका संरक्षक कुंपणाने बंद केलं आहे जेणेकरून कोणीही नकळत आत जाऊ नये. शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे की हा वायू इतका दाट आहे की दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणूनच या गुहेत प्रवेश करणारे लोक कधीही परत येऊ शकले नाहीत. (सर्व फोटो : सोशल मीडिया)


