कोणत्याही हिरोईनपेक्षा कमी नाही हा ट्रान्सजेंडर, मोहित बनून केलं लग्न, पण आता आला मोठा ट्विस्ट
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
बिहारमधला एक तरुण अतिशय सुंदर दिसणाऱ्या एका ट्रान्सजेंडरच्या (तृतीयपंथीय) प्रेमात पडला. दोघांनी लग्नही केलं; मात्र आता तरुणाचे कुटुंबीय त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे.
बिहारमधल्या दानापूर इथे एक विचित्र प्रकरण घडलं आहे. तिथे आरपीएस आर्य समाज रोडवरच्या लाल मुनी एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या रवी नावाच्या तरुणाने एका तरुणीशी लग्न केल्याचा सर्वांचा समज होता; मात्र प्रत्यक्षात ती व्यक्ती स्त्री नसून दरभंगा इथे राहणारी तृतीयपंथीय व्यक्ती अर्थात ट्रान्सजेंडर आहे. या ट्रान्सजेंडरचं नाव अध्विका असं आहे.
advertisement
advertisement
दोघांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन हिंदू रीतिरिवाजांनुसार लग्न केलं. रविकुमार हा सत्येंद्र सिंह या राजकीय नेत्याचा मुलगा आहे. रविकुमारने सांगितलं, की इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर अध्विका चौधरी सिंहशी त्याची मैत्री झाली होती. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघांनी गेल्या वर्षी 25 जून रोजी प्रेमविवाह केला.
advertisement
advertisement
रवीचं म्हणणं आहे, की वडील सत्येंद्र सिंह आणि भाऊ धनंजय कुमार यांनी लग्नानंतर त्याच्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. अपशब्द बोलून तिचा अपमान केला. पती-पत्नीला दररोज जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. हुंडा म्हणून तिच्याकडे 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास तिचं अपहरण करून जिवे मारण्याची धमकीही दिली आहे.
advertisement
advertisement









