Weather Alert: 150 किमी वेगाने संकट शहराकडे, 50 किलो वजनाची माणसं उडून जाण्याचा अलर्ट
- Published by:sachin Salve
Last Updated:
अशातच आता चीनवर आणखी एक मोठं अस्मानी वादळ घोंघावत आहे. चीनमध्ये 150 वेगाने वादळ येण्याची सुचना हवामान विभागाने दिली आहे.
जगभरात सध्या हवामानामध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. काही देशांमध्ये अचानक उष्णता वाढली आहे तर कुठे पावसाचं संकट आलं आहे. अलीकडे म्यानमारसह अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अशातच आता चीनवर आणखी एक मोठं अस्मानी वादळ घोंघावत आहे. चीनमध्ये 150 वेगाने वादळ येण्याची सुचना हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे चीनमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच लोकांना बाहेर न पडण्याची सुचना दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्पर्धा केल्या रद्द - बीजिंग शहरात वारे खूप जोरात असतील. हे बराच काळ टिकतील आणि मोठ्या क्षेत्रावर परिणाम करतील, जे विनाशकारी ठरू शकते. चीनमध्ये वाऱ्याचा वेग १ ते १७ या प्रमाणात मोजला जातो. चीनच्या हवामान खात्यानुसार, या आठवड्याच्या शेवटी ११ व्या पातळीचे वारे वाहतील ज्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकतं. लेव्हल १२ वाऱ्यांमुळे प्रचंड विनाश होतो. या आठवड्याच्या शेवटी, चीनमध्ये वारे ११ ते १३ पातळीच्या दरम्यान वाहण्याची अपेक्षा आहे.
advertisement
ज्यामुळे जगातील पहिल्या ह्युमनॉइड रोबोट हाफ मॅरेथॉनसह अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे गरज असेल तर घराबाहेर पडा, असा सल्लाच चीन प्रशासनाने दिला आहे. खबरदारी म्हणून उद्यानं आणि पर्यटन केंद्रे बंद करण्यात आली आहेत. एवढंच नाही शहरे आणि आसपासच्या भागात बांधकाम आणि रेल्वे सेवा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत.
advertisement