viral : तुम्हाला माहितीये का, विहीर गोलच का असते? कधी चौकोनी किंवा त्रिकोणी का नसते?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
आपण सगळ्यांनीच आतापर्यंत गोल आकाराची विहीर पाहिली आहे. विहिरीचा आकार गोलच का असतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ती चौकोनी किंवा त्रिकोणी का बरं बांधली जात नाही?
भूगर्भातलं पाणी काढण्यासाठी विहीर खोदली जाते. ग्रामीण भागात आपण विहिरी सर्रास बघू शकतो. शहरात राहणाऱ्यांना या विहिरीचं विशेष आकर्षण असतं. विहिरीच्या पाण्यात लवकर पोहायला शिकता येतं आणि त्यात पोहायला शिकलं की ते आयुष्यभर लक्षात राहतं, असं म्हणतात. आपण सगळ्यांनीच आतापर्यंत गोल आकाराची विहीर पाहिली आहे. विहिरीचा आकार गोलच का असतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ती चौकोनी किंवा त्रिकोणी का बरं बांधली जात नाही?
advertisement
advertisement
advertisement
विहिरीतलं पाणी पूर्वी रहाटाने काढलं जायचं. आता पंपाने उपसा केला जातो. पिण्यासाठी, शेतीसाठी तर काही ठिकाणी घरगुती वापरासाठीसुद्धा विहिरीतल्या पाण्याचा वापर केला जातो. विहिरीसाठी खड्डा खोदताना भूगर्भातल्या पाण्याच्या पातळीपर्यंत खोल खोदला जातो. तिथल्या जिवंत झऱ्यांमुळंच विहिरीला पाणी लागतं. त्यानंतर तिथं खड्ड्याच्या बाजूनं दगडाच्या भिंतीचं बांधकाम करतात.
advertisement
advertisement
advertisement
गोल आकार बांधायला सोपा - विहिरीचं बांधकाम गोल आकारात केल्यामुळंच विहिरी वर्षानुवर्षं टिकतात. त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे ते तिच्या आकाराचं. चौकोनी किंवा त्रिकोणी आकारात विहीर न बांधण्याचं एक कारण असंही आहे, की या दोन्ही आकारांच्या तुलनेत गोलाकार विहीर बांधणं खूप सोपं असतं. त्यामुळे आपल्या पूर्वजांनीसुद्धा ज्या विहिरी बांधल्या त्यांचा आकार गोल होता.


