अशोक चव्हाणांना आणखी एक धक्का; जिवलग मित्रानेही सोडली साथ, काँग्रेसकडे मागितली उमेदवारी

Last Updated:

आता अशोक चव्हाण यांचे अनेक शिलेदार काँगेसमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता अशोक चव्हाण यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे

अशोक चव्हाणांना धक्का (फाईल फोटो)
अशोक चव्हाणांना धक्का (फाईल फोटो)
नांदेड (मुजीब शेख, प्रतिनिधी) : अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमधील त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील काँगेसला सोडचिठ्ठी दिली होती. पण आता अशोक चव्हाण यांचे अनेक शिलेदार काँगेसमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता अशोक चव्हाण यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळचे मित्र डी. पी सावंत यांनी देखील चव्हाणांची साथ सोडली आहे.
अशोक चव्हाण यांचे महाविद्यालयीन मित्र माजी राज्यमंत्री डी. पी सावंत यांनी देखील अशोक चव्हाण यांची साथ सोडली आहे. डी. पी सावंत हे काँगेसकडून दोनवेळा आमदार आणि राज्यमंत्री होते. त्यांनी आता नांदेड उत्तरमधून काँगेसकडे उमेदवारी मागितली आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर डी.पी सावंत काँगेस पक्षात सक्रिय नव्हते. त्यांनी पक्ष सोडला नव्हता. मात्र, आपली भूमिकादेखील स्पष्ट केली नव्हती. आता मात्र त्यांनी काँगेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे, हा अशोक चव्हाणांसाठी धक्का मानला जात आहे. याशिवाय अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील, माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख यांच्यासह अनेकांनी आता काँगेसमध्ये प्रवेश केला आहे.
advertisement
काँग्रेस पक्षाने सगळ्या जिल्ह्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या मतदारसंघांतील इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सावंत यांनी मुंबई आणि दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. पक्षासोबतच राहून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
view comments
मराठी बातम्या/Politics/
अशोक चव्हाणांना आणखी एक धक्का; जिवलग मित्रानेही सोडली साथ, काँग्रेसकडे मागितली उमेदवारी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement