Vidhansabha Election : जागावाटपावरुन आघाडीत जुंपणार? संभाजीनगरमधील 8 जागांवरुन दानवेचं मोठं वक्तव्य
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकांपूर्वीच महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरुन जुंपण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, (अविनाश कानडजे, प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुका अवघ्या 3 महिन्यांवर येऊन ठेपल्यात. अशात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाने पुण्यातील 8 पैकी 6 जागांवर दावा ठोकला होता. आता ठाकरेही गटाने छत्रपती संभाजीनगरमधील 8 पैकी 8 जागांवर दावा केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे यांनी संभाजीनगरमध्ये हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषदेचे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (रविवार) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळावा पार पडणार आहे. शहरातील सूर्या लॉन्समध्ये हा मेळावा पार पडेल. तत्पूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
संभाजीनगरमध्ये सर्व जागा लढण्यास इच्छुक : दानवे
प्रत्येक मतदारसंघात कोण इच्छुक आहे? याची यादी आम्हाला ऑलरेडी प्राप्त झाली आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सुद्धा नऊच्या नऊ जागा लढवण्याची आमची इच्छा असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. शिवाय आमच्याकडे ऑलरेडी 6 जागा नॅचरली आहेत, असेही दानवे म्हणाले.
advertisement
शिव संकल्प मेळावा
खरंतर हा मेळावा म्हणजे विधानसभेच रणशिंग फुकण्याचा आहे. प्रामुख्याने हा मेळावा जरी असला तरी याला शिबिराचा स्वरूप आम्ही दिलेलं आहे. साधारणपणे 5000 जण या शिव संकल्प मेळाव्याला उपस्थित राहतील. त्यामुळे विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही.
advertisement
भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदेंचा प्रवेश कधी?
शिंदे यांचा प्रवेशही होणार आहे. मात्र, त्याला थोडा वेळ आहे. शिवाय अजून काही प्रवेश होणार असल्याचं सूचक विधान दानवे यांनी केलं. शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने आज निवडणुकीचे फॉर्म मागवलेले आहे. शिवसेनेने मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्येच पूर्ण 288 विधानसभा मतदारसंघ बैठका घेतलेले आहे. त्यामुळे कोण इच्छुक आहे, याचा चांगला अभ्यास आम्हाला आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
July 06, 2024 8:19 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Vidhansabha Election : जागावाटपावरुन आघाडीत जुंपणार? संभाजीनगरमधील 8 जागांवरुन दानवेचं मोठं वक्तव्य