कुण्या एका काळच्या मित्रानेच नीचपणा केला, उद्धव ठाकरे मालवणात कडाडले

Last Updated:

चांगले उद्योग तिकडे नेता आणि विनाशकारी रिफायनरी आम्हाला देता. आम्हाला राख आणि गुजरातला रांगोळी देता, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

News18
News18
सिंधुदुर्ग :  लोकसभा निवडणुकीत  (Lok Sabha Election 2024) उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (Uddhav Thackeray Shiv Sena)  या पक्षाला कोकणात पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवाविषयी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी जाहीर सभएत वक्तव्य केले आहे. लोकसभेला आम्ही कमी पडलो. इथला पराभव माझ्या हृदयाला चटका लावून गेला. राजकारणातला नीचपणा कोणा एकेकाळच्या मित्राने केला याचा राग आणि दुःख आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. मालवण येथे वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेला आम्ही कमी पडलो. कोकणातील पराभव माझ्या हृदयाला चटका लावून गेला आहे. कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण असे आपले नाते आहे. हे नाते कोणी तोडू शकत नाही. कोकणावर संकट येते त्यावेळी शिवसेना धावून येते. शिवसेनेसाठी कोकण धावून येतो. राजकारणातला निचपणा कोणी एकेकाळच्या मित्राने केला याचा राग आणि दुःख आहे. त्याच वेळी शिवसेना प्रमुखांनी एकट्याने लढायचे ठरवले असते तर आज भाजप औषधाला सुद्धा नसते. भूतदया असल्याने त्यांना खांद्यावर घेतले. हे एवढे नीच निघाले स्वतःचे काम झाल्यावर वापरून फेकून देत आहेत.
advertisement

आडवे आले तर आडवे करू, उद्धव ठाकरेंचे आव्हान

लोकसभेला जशी सभा होते तशी विधानसभेच्या सभेला गर्दी होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेची मशाल पेटली आहे. वैभव मला तुझा अभिमान आहे तुलाही खोके मिळाले असते पण तू हटला नाहीस मोदी शहांना लाचार झाला नाही. विनायक राऊत पण असेच आहेत. जुनी शिवसेना परत उभी राहत आहे. मला आव्हान दिले रस्त्याने येऊन दाखवा. मी त्यांना आव्हान देतो आडवे आले तर आडवे करू. नशिबाने दिले ते सरळ खावा. कोकणचे वैभव हवे की गुंडा पुंडाचे राज्य हवंय हे आथा कोकणवासीयांनी ठरवावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement

हुकूमशाही नको शिवशाही हवी म्हणून काँग्रेससोबत : उद्धव ठाकरे

शिवसेना हा पक्ष माझ्या वडिलांनी स्थापन केलाय. मोदी त्यावेळी तुम्ही हिमालयात होतात आणखी कुठे माहीत नाही. हिंदुत्वाला साथ देणारी शिवसेनेची घराणेशाही तुम्हाला चालत नाही. इथे गुंडगिरी करणाऱ्यांची घराणेशाही चालते का? मी हिंदूत्व सोडले नाही भाजप सोडले आहे. आम्हाला हुकूमशाही नको शिवशाही हवी म्हणून काँग्रेस सोबत आम्ही एकत्र आलोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement

तुम्ही मला का अडवता? उद्धव ठाकरेंचा सवाल

उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदी उतरत नाहीत तोपर्यंत माझे हेलिकॉप्टर उडवू दिले नाही. पंतप्रधान म्हणून मिरवायचे तर तुम्ही तसे वागा. मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर चुकीचे वागलो नाही. देशाचा पंतप्रधान उमेदवाराच्या प्रचाराला येऊ नये असा नियम केला पाहिजे. माझ्यासाठी सभेला जिवाभावाची लोक थांबली होती. तुम्ही मला का अडवता?
advertisement

वाऱ्याने दाढी हलली नाही आणि पुतळा पडला : उद्धव ठाकरे

राज्यपाल कोश्यारी होते त्यांनी महाराजांचा अवमान केला त्यांना मोदींनी हटवले नाही. मोदींचा अवमान केला असता तर त्याला लगेच हटवले असते. मोदींची बॅग तपासली त्याला निलंबित केले होते. वाऱ्याने दाढी हलली नाही आणि पुतळा पडला म्हणता, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement

आम्हाला राख आणि गुजरातला रांगोळी देता : उद्धव ठाकरे

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रत ज्यावेळी सरकार येईल त्यावेळी लुटारूंनो तुम्हाला उद्योग गुजरातला नेऊ देणार नाही. चांगले उद्योग तिकडे नेता आणि विनाशकारी रिफायनरी आम्हाला देता. आम्हाला राख आणि गुजरातला रांगोळी देता. मोदी शाह तुम्ही आज आहेत, उद्या नाही... तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्रात भींत बांधत आहात हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र लुटायला न देणारा एकच माणूस आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे...
view comments
मराठी बातम्या/Politics/
कुण्या एका काळच्या मित्रानेच नीचपणा केला, उद्धव ठाकरे मालवणात कडाडले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement