मग ते 3 वर्षे कुठं होते? प्रियांका गांधींच्या भाषणानंतर कोल्हापूरकर थेटच बोलले..
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Priyanka Gandhi in Kolhapur: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी त्यांनी सभा घेतली.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी शनिवारी (ता. 16) कोल्हापूर दौऱ्यावर आल्या. महात्मा गांधी मैदान येथे त्यांची जाहीर सभा झाली. प्रियांका गांधी पहिल्यांदाच कोल्हापूरला येत असल्याने महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या जिल्हा कमिटीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. प्रियांका यांनी कोल्हापुरात बोलताना शेती संदर्भात, युवकांच्या रोजगार विषयी आणि महिलांच्या संरक्षणाबद्दल विविध घोषणा केल्या. या संदर्भात लोकल 18 ने नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच
प्रियांका गांधींनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आलं तर शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार अशी घोषणा केली. यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. तसेच महायुतीकडून राबवण्यात आलेल्या अनेक योजनांचा अजूनही पत्ता नाही अशी टीकाही त्यांनी केली. तसेच माविकास आघाडीच्या सरकारने कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात जसा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याप्रमाणे आघाडीने पूर्ण केले. राज्यातही त्याच प्रकारे महाविकास आघाडी सत्तेत आली तर आश्वासन पूर्ण करेल, असा विश्वास सभास्थळी काही मतदारांनी व्यक्त केला.
advertisement
युवकांकडून समाधान
कोल्हापुरातील सभेदरम्यान प्रियंका गांधींनी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली. तसेच बेरोजगारांना 4 हजार रुपये मासिक भत्ता देणार असल्याचं सांगतिलं. त्यांनी शिकण्याचं आणि संघटित होऊन काम करण्याचं महत्त्व सांगितलं, असं उपस्थित तरुणांनी सांगितलं. तसेच महायुतीच्या सरकारप्रमाणे फोडाफोडी आणि सरकार पाडण्याचं विधान त्यांच्या भाषणात आलं नाही. उलट युवकांना रोजगार महिलांना सुरक्षितता अशा बाबींनी त्यांनी महत्त्व दिल्यानं त्यांचं भाषण आवडलं, असे तरुण सांगतात.
advertisement
..तर ते तीन वर्षे कुठं होते ?
महाविकास आघाडीने कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांमध्ये विकासाची गंगा आणली. त्याच्या उलट राज्यात महायुतीचं सरकार आहे. महायुतीने महिलांना 1500 रुपये दिले. पण गेल्या तीन वर्षांपासून हा विचार करायला हवा होता. इलेक्शन दरम्यान ही योजना आणून त्यांनी कोणता उद्देश साध्य केला? असा प्रश्न सामान्य नागरिकातून व्यक्त होत होता.
advertisement
परिवर्तन घडलंच पाहिजे !
महायुतीचं सरकार राज्यात लाडकी बहीण योजना राबवत आहे. त्यांच्यामार्फत महिलांना पंधराशे रुपये मिळतात खरे पण हे पंधराशे रुपये सामान्य नागरिकांकडून घेण्यात आलेल्या टॅक्स मधून दिले जातात. आणि ते तसं गाजावाजा करतात. पण महविकास आघाडी सरकार हे त्यापैकी नाही. तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये 3000 रुपये महिलांना दिले जातात. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही आघाडीचे सरकार आलं तर ही योजना अस्तित्वात आणली जाणार आहे, असं मत महिला मतदारांनी व्यक्त केलं.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Nov 17, 2024 8:02 AM IST
मराठी बातम्या/Politics/
मग ते 3 वर्षे कुठं होते? प्रियांका गांधींच्या भाषणानंतर कोल्हापूरकर थेटच बोलले..








