Pune Police : पुणे पोलिसांचं चाललंय काय? ड्रग्स प्रकरणाला मोठा आरोपी पळाला, 9 जणांचं निलंबन

Last Updated:

Pune Police : ड्रग्स तस्करी प्रकरणात ससून रुग्णालयातील पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या आरोपीचे संशयास्पदरित्या पलायन.

पुणे पोलिसांचं चाललंय काय?
पुणे पोलिसांचं चाललंय काय?
पुणे, 3 ऑक्टोबर (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : ड्रग्स तस्करी प्रकरणात ससून रुग्णालयातील पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या आरोपीने संशयास्पदरित्या पलायन केलं. ललित पाटील असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर एका अधिकाऱ्यासह 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पुणे पोलिसातील 9 जणांचे निलंबन
ड्रग्स प्रकरणात एका अधिकाऱ्यासह 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये एका महिला अधिकाऱ्यासह 9 जणांचा समावेश आहे. निलंबन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे.. पीएसआय जनार्दन काळे, पीसी विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव, पीएसआय मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, नाईक नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे, शिपाई आमित जाधव.
advertisement
रविवारी 2 कोटींचे ड्रग्स जप्त
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून तब्बल 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. तर सध्या तुरुंगात असलेला पण आता ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ललित पाटील याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ललित पाटील या संपूर्ण प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. कोर्टामार्फत त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली होती. त्याला ससून रुग्णालयातील पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून तो संशयास्पदरित्या पळून गेला. बंदोबस्तावर असणारे कर्मचारी नेमके काय करत होते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
advertisement
वाचा - प्रेमाचा भयानक शेवट! आधी गाडीत फिरले, मग प्रेमी युगुलाने चिरला एकमेकांचा गळा
ललित पाटील पळून गेल्याने पुणे पोलिसांचे धाबे दणाणले आहे. कारण तब्बल दोन कोटी रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड ललित पाटील होता. त्याला कारागृहात परत पाठवण्यासाठी कारागृह प्रशासनानेही ससून रुग्णालयाला चार पत्र लिहीली होती. मात्र, वेगवेगळ्या प्रकृतीच्या तक्रारी करून ललित ससून रूग्णालय थांबून त्याचा अंमली पदार्थाचा धंदा बिनबोभाट चालवत होता. यात गार्डवर असलेले पोलीस कर्मचारीही सामील होते का? याचा तपास होण गरजेच आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
ललित पाटीलच्या पळून जाण्याने ससून रूग्णालय गार्डवर असलेले पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात काय प्रकारची सौदेबाज चालते याचं ढळढळीत उदाहरण समोर आलंय. चव्हाट्यावर आलेली अब्रू वेशीवर टांगली जाण्यापूर्वी पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची दखल घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Police : पुणे पोलिसांचं चाललंय काय? ड्रग्स प्रकरणाला मोठा आरोपी पळाला, 9 जणांचं निलंबन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement