Ajit Pawar : पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासण्याचा प्रयत्न; 'त्या' वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पुणे, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : विधानसभेच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर अजित पवार गट आक्रमक झाला असून भाजपच्या कार्यालयात राडा केल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात राष्ट्रवादीचं आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी सुदर्शन चौधरी यांच्या पुणे बाजार समिती कार्यालयात आंदोलन केलं. सुदर्शन चौधरी यांनी राष्ट्रवादी महायुतेमध्ये नको अशी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काळं फासण्याची तयारी केली होती. पण चौधरी बाजारसमितीत बंद खोलीत बसून आहेत.
काय आहे प्रकरण?
भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये त्यांची खदखद बोलून दाखवली. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसले, अशी टीका भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
advertisement
वाचा - पंकजा मुंडेंना विधानपरिषद का राज्यसभा? भाजपचं ठरलं; मोठं पदही मिळणार!
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने एकत्र निवडणूक लढली. या निवडणुकीत महायुतीला फक्त 17 जागांवर यश मिळालं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा जिंकता आली. शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला, यानंतर राष्ट्रवादीने शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली. आढळराव पाटलांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली. शिरूरच्या या लढतीमध्ये अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 27, 2024 6:08 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासण्याचा प्रयत्न; 'त्या' वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक