advertisement

Ajit Pawar Death : अजितदादांच्या विमानाच एक नव्हे दोन 'ब्लॅक बॉक्स' होते, तपासात ब्युरोला मोठं यश! काय समोर आलं?

Last Updated:

Ajit Pawar Death Investigation update : विमान दुर्घटना तपास ब्युरो (AAIB) द्वारे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या लिअरजेट 45 (VT-SSK) विमान अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे.

Ajit Pawar Death Investigation update
Ajit Pawar Death Investigation update
Ajit Pawar Death Investigation : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला होता. देशाला हादरवणाऱ्या या घटनेनंतर आता विमान दुर्घटना तपास ब्युरो या अपघाताचा कसून तपास करत आहे. अशातच आता अपघाताच्या तपासाबाबत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने काही महत्त्वाचे अपडेट दिले आहेत. यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अपघाताची सखोल चौकशी सुरू

विमान दुर्घटना तपास ब्युरो (AAIB) द्वारे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या लिअरजेट 45 (VT-SSK) विमान अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. ही तपासणी विमान नियम 2017 आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) मानकांनुसार केली जात असल्याचं ब्युरोने सांगितलं. अपघाताचे मूळ कारण शोधण्यासाठी तांत्रिक पथके घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांचे विश्लेषण करत आहेत.
advertisement
advertisement

अजितदादांच्या विमानात दोन ब्लॅक बॉक्स

या विमानामध्ये दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर्स (Black Box) बसवण्यात आले होते. अपघाताच्या वेळी लागलेल्या भीषण आगीमुळे हे दोन्ही रेकॉर्डर्स दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात होते, ज्यामुळे त्यांचे बाह्य नुकसान झाले आहे. तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे 'ब्लॅक बॉक्स' आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विमान दुर्घटना तपास ब्युरो या प्रकरणाचा तपास अत्यंत निष्पक्ष आणि पुराव्यांच्या आधारावर करत आहे.
advertisement

DFDR ची माहिती मिळवण्यात यश

डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (DFDR) मधील माहिती यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात एएआयबीच्या प्रयोगशाळेला यश आले आहे. मात्र, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) ची स्थिती अधिक गंभीर असल्याने त्याची तांत्रिक तपासणी अजूनही सुरू आहे. यातील डेटा मिळवण्यासाठी आता थेट उत्पादक देशाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून विशेष तांत्रिक मदत घेतली जात आहे. तपासाची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक ठेवली जाईल आणि योग्य टप्प्यावर याबद्दलची अधिकृत माहिती सर्वांशी शेअर केली जाईल, असे आश्वासन ब्युरोने दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Death : अजितदादांच्या विमानाच एक नव्हे दोन 'ब्लॅक बॉक्स' होते, तपासात ब्युरोला मोठं यश! काय समोर आलं?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement