Ajit Pawar : 'माझं टक्कल पडलाय तरी मलाच...', अजितदादांची भरसभेत पिकवला हशा, म्हणाले 'बाबा लोकांना...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ajit Pawar Funny Speech Video : राजगुरुनगर येथील भरसभेत अजित पवारांनी बाबा लोकांचे ऐकावं लागतं. कोणत्या बाबा लोकांचे ते तुम्ही ठरवा, असं मिश्किल विधान अजित पवारांनी केलंय.
Ajit Pawar In Rajgurunagar (सचिन तोडकर, प्रतिनिधी) : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज पुण्यात अखेरचा हात फिरवत आहेत. अशातच आता राजगुरुनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी एकच हशा पिकवला.
माझं टक्कल पडलं तरी हे मलाच...
राजगुरुनगर येथील भरसभेत अजित पवारांनी बाबा लोकांचे ऐकावं लागतं. कोणत्या बाबा लोकांचे ते तुम्ही ठरवा, असं मिश्किल विधान अजित पवारांनी केलंय. राजगुरुनगर येथील सभा सुरु असताना अजित पवारांना बाबा राक्षे हे काही मुद्दे देत असताना आता मला शिकवायला लागलेत, आता असं तसं बोला माझं टक्कल पडलं तरी हे मलाच शिकवतात काय करावं, असं म्हणत अजित पवारांनी बाबा राक्षेंच्या कृतीचे मिश्किल टिपणी केली.
advertisement
माझा टक्कल पडलाय तरी मला हे शिकवतात, राजगुरूनगरमध्ये अजित पवारांनी पिकवला हशा, म्हणाले...#AjitPawar #Pune pic.twitter.com/DIcAfE6xdO
— News18Lokmat (@News18lokmat) December 1, 2025
70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला पण...
मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र काही लोकं माझ्यावर आरोप करतात. मी असा आहे, तसा आहे, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. तुम्ही दाखवून द्या, की मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले किंवा चिरीमिरी द्यावी लागली. उलट प्रशासन मला टरकून राहतात, असं वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं.
advertisement
परत म्हणाल मी दम दिला... - अजित पवार
येत्या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. आत्ता आचारसंहिता असल्यानं मला स्पष्टपणे बोलता येणार नाही. मात्र या अधिवेशनात तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी किती निधी लागेल, त्यासाठी काय करावं लागेल, हे पाहतो. पण आचारसंहितेमध्ये मला यावर बोलता येणार नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत. तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं ऐकेन. परत म्हणाल मी दम दिला. म्हणून तुम्ही माझी विनंती ऐकली तर मी तुमची विनंती ऐकेन, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 01, 2025 12:57 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : 'माझं टक्कल पडलाय तरी मलाच...', अजितदादांची भरसभेत पिकवला हशा, म्हणाले 'बाबा लोकांना...'


