राज ठाकरेंकडून भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे कौतुक; दिली खास भेट आणि इतकी देणगी
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chandrakant Funde
Last Updated:
Pune Latest news: ही संस्था मोठी झाली पाहिजे, लोकांपर्यंत इतिहास पोचला पाहिजे. नुसते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटले म्हणजे इतिहास होत नाही. आपल्या रक्तात अजून महापुरुष शिरायचे आहेत...
पुणे, 10 फेब्रुवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील भारतीय इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. मंडळाकडून केल्या जात असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केलं. भारतीय इतिहास संशोधन मंडळाला खास भेट आणि देणगी दिली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, भारतीय इतिहास संशोधन मंडळात येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. हजारो वर्षाचा इतिहास या ठिकाणी जतन केला गेला आहे, बाकीकडे फक्त भूगोल आहे. इतिहास प्रत्येकांनी वाचला पाहिजे. ही सगळी संस्था मी आज पाहिली. माझ्याकडून काही तरी करावेसे वाटते म्हणून मनसेकडून आज या संस्थेला 25 लाख रुपयांची देणगी देत आहे. ही संस्था मोठी झाली पाहिजे, लोकांपर्यंत इतिहास पोचला पाहिजे. नुसते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटले म्हणजे इतिहास होत नाही. आपल्या रक्तात अजून महापुरुष शिरायचे आहेत, आपण फक्त जातीतून महापुरुषांना पाहतो. आज तेच महाराष्ट्राचं राजकारण बनलं आहे.
advertisement
बाबरी मशीद पाडली तेव्हाची एक वीट राज ठाकरे यांच्याकडे होती. ती त्यांनी या मंडळाकडे सुपूर्द केली. त्याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बाबरी मशीद पाडली तेव्हा आमचे नेते बाळा नांदगावकर तिथे उपस्थित होते, तेथील एक वीट त्यांनी आणली होती, ती त्यांनी मला भेट दिली. ती वीट तुम्हीही सर्वांनी पहा, आधीचे बांधकाम कसे होते बघा. एक हातोडा मारला आणि मशीद पडली असं नाही. मजबूत बांधकाम होते, तेव्हा टेंडर निघत नव्हते. ती वीट मी आज इतिहास संशोधन मंडळात देत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 10, 2024 2:39 PM IST