Bacchu Kadu : 'तुम्ही फक्त माहिती द्या...', बच्चू कडूंचं शोध अभियान, WhatsApp नंबर केला जारी
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Bacchu Kadu : आयएएस पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणानंतर आमदार बच्चू कडू यांनी नवीन मोहीम हाती घेतली आहे.
पुणे, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन UPSC मध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची दखल थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतली आहे. UPSC ने त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली आहे. याशिवाय नागरी सेवा परीक्षा 2022 मधून त्यांची उमेदवारी का रद्द करण्यात येऊ नये आणि भविष्यातील परीक्षांपासून त्यांना का रोखण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांचे प्रकरण समोर आल्यानंतर अशाच प्रकारे अनेकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवल्याचं बोललं जात आहे. अनेकजण सोशल मीडियावर अशा लोकांची माहितही पोस्ट करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांसाठी लढणारे आणि प्रहास संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी एक मोहीम हाती घेतली आहे.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान
सरकारी नोकरी मिळविण्यासाठी ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकरी घेतली आहे, यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखली शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास ती 9158278484 या नंबर वर व्हॉट्स करावी. माहिती देणाऱ्यांची नाव गोपनीय ठेवले जाईल, असं आवाहन आता बच्चू कडू यांनी केलं आहे.
advertisement

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी लाटल्याची माहिती मला समजली आहे. यावर मी आधी पण बोललो आहे. यामध्ये एक समिती गठीत करत आहे. ज्यांनी फसवणूक करून दाखले घेतले आहेत, अशा लोकांवर सुधारित नवीन कलमानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल होतील. पूजा खेडकर दिव्यांग नसताना तिने याचा लाभ घेतला. अशा झारीतल्या शुक्राचार्यांना शोधून काढू, असेही बच्चू कडू म्हणाले होते.
advertisement
पूजा खेडकर यांना जन्मठेप व्हावी : बच्चू कडू
मंगळवारी बच्चू कडू यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. यावेळी पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे. हायकोर्टाचे निकाल बदलायला लागले आहेत. आता काय राहिले? UPSC सारखी संस्था जर अशी वागत असेल तर त्या संस्थेवर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. पूजा खेडकरला पदावरुन बाहेर काढून तिला जन्मठेपेपर्यंत पोहोचवले पाहिजे. पुन्हा असा कोणी गुन्हा करणार नाही, अशाप्रकारची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 19, 2024 11:26 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Bacchu Kadu : 'तुम्ही फक्त माहिती द्या...', बच्चू कडूंचं शोध अभियान, WhatsApp नंबर केला जारी