महापालिका निवडणुकांचा अजित पवारांनी वचपा काढला, पुण्यात भाजपचा बडा मोहरा फोडला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मावळ तालुक्यात भाजपने पहिला धक्का अजित पवारांना दिला आहे. त्यानंतर अजित पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे.
पुणे : पुणे जिल्हा हा गेली काही दशक राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा कंबर कसली आहे. पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या डावपेचांना वेग आला आहे. मावळ तालुक्यात भाजपने पहिला धक्का अजित पवारांना दिला आहे. त्यानंतर अजित पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अजूनही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं होतं महापालिका निवडणुकांमध्ये त्यांना मोठा झटका बसला आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील अजित पवार भाजपला दणका देण्याच्या तयारीत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
advertisement
अजित पवारांचा भाजपला धक्का
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवारांनी भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. खेड तालुक्यात अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत या प्रवेशामुळं बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार आहेत. बुट्टे यांनी गेल्या आठवड्यात अजित पवारांची भेट घेतली होती, आज पुण्यात पुन्हा एकदा ते अजित पवारांना भेटले आणि उद्या प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
advertisement
पुण्यात भाजपला दादांची जोरदार टक्कर
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये दादांनी जोरदार टक्कर दिली मात्र अपेक्षित असं यश काय त्यांना मिळालं नाही. त्यामुळे हा पराभव मागे टाकून आता अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेतची सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील एकत्र येण्याबाबत चर्चा करत आहे. नुकतीच या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक देखील झाली.
advertisement
भाजपला दादांची धास्ती?
पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी युतीसंदर्भात मुरलीधर मोहोळ, विजय शिवतारे, चंद्रकांत पाटील, राजेश पांडे आणि राहुल कुल यांनी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत जिल्ह्यातील भाजपचे आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्या बैठकीत मोहोळ आणि पाटील यांनी जिल्ह्यातील निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले होते. अजित पवारांचा ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचा मतटक्का लक्षात घेता या निवडणुकांसाठी भाजप-शिवसेनेने युतीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचीर बैठक झाली.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 9:30 PM IST









