“पोरांनो, आत्ता प्रेम नको…”, सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांचा संदेश; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
- Reported by:Namita Suryavanshi
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यातील 'केर्ली' गावातून आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या ट्रॅव्हल्स बसमध्ये पोलिसांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना काही आयुष्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई: राज्यातील विविध भागांतून दरवर्षी शाळांच्या वार्षिक सहलीसाठी विद्यार्थी मुंबईत येतात. अशाच एका सहलीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा देवस्थानाच्या पायथ्याशी असलेल्या 'केर्ली' गावातून आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या ट्रॅव्हल्स बसमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईत मुक्कामी असताना विद्यार्थ्यांच्या शाळेच्या ट्रॅव्हल्स बसला सदिच्छा भेट देत महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी सुशील शिंदे बसमध्ये चढले. यावेळी बसमध्ये विद्यार्थ्यांसोबत शाळेतले शिक्षकही उपस्थित होते.
पोलिसांनी स्वतःची ओळख करून देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संवादादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना उद्देशून, “पोरांनो, आत्ता प्रेम करू नका. सध्या शालेय जीवन आहे. पुढे कॉलेज आहे, आयुष्य मोठं आहे,” असे सांगितले. सध्याच्या काळात लहान वयातच भावनिक गुंतागुंत वाढत असल्याचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांनी आधी शिक्षण आणि भविष्य घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा संदेश त्यांनी दिला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना परमेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच आई-वडिलांप्रती प्रेम आणि आदर ठेवण्याचे महत्त्व सांगितले.
advertisement
आई-वडिलांनी मुलांसाठी घेतलेल्या कष्टांचा उल्लेख करत, “पहिलं करिअर, पहिलं भविष्य घडवा; आयुष्य सुंदर आहे,” असे त्यांनी संवादात नमूद केले. सदर पोलीस कर्मचारी सोशल मीडियावर विविध विषयांवर व्हिडिओ पोस्ट करत असतात. विद्यार्थ्यांशी झालेल्या या संवादाचाही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, तो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी पोलिसांनी दिलेल्या संदेशाचे कौतुक केले असून, विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य दिशा मिळाल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी ही मुले अजून कोवळ्या वयातील असून, अशा विषयांवर आधीच भाष्य करून त्यांना घाबरवू नये किंवा अनावश्यक दबाव देऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 9:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
“पोरांनो, आत्ता प्रेम नको…”, सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांचा संदेश; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल










