MPSC Success Story : सतत अपयश आलं, पण संस्कृती बालगुडेच्या भावानं करून दाखवलं, MPSC परीक्षेत कसं मिळवलं यश? Video
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
MPSC Success Story : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचा भाऊ समर्थ बालगुडे याने आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्रातून 42वी रँक मिळवली आहे.
पूजा सत्यवान पाटील प्रतिनिधी पुणे
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात अनेकांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि सातत्याला यश मिळालं आहे. त्यामध्ये मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचा भाऊ समर्थ बालगुडे याने आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्रातून 42वी रँक मिळवली आहे. त्याच्या या संपूर्ण प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
समर्थ बालगुडे यांनी सांगितलं की त्यांचं शालेय शिक्षण सिम्बॉयसिस प्रायमरी आणि सेकंडरी स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी बीएमसीसी कॉलेजमधून बी.कॉम पदवी पूर्ण केली. बी.कॉम झाल्यावर नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजमधून LL.B. (Bachelor of Laws) आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमधून LL.M. (Master of Laws) पूर्ण केलं.बी.कॉम करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी UPSC च्या दोन परीक्षा दिल्या, पण त्यात यश मिळालं नाही. त्यानंतर 2020 पासून त्यांनी MPSC कडे वळण्याचा निर्णय घेतला. शिक्षणासोबतच त्यांनी नोकरी आणि अभ्यास दोन्ही सांभाळले.
advertisement
या प्रवासात समर्थ आयबीच्या मुलाखतीपर्यंत पोहचला होता. एमपीएससीची तीन वेळा मेन्स परीक्षा दिल्यानंतर, पहिल्याच मुलाखतीत समर्थने महाराष्ट्रात 42 वी रँक मिळवत आपलं स्वप्न पूर्ण केलं. समर्थ ओपन जनरल कॅटेगरीमध्ये तिसरा आला आहे. कामानंतर उरलेला वेळ त्यांनी अभ्यासासाठी दिला. सातत्य, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर समर्थ बालगुडे यांनी अखेर क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 2:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
MPSC Success Story : सतत अपयश आलं, पण संस्कृती बालगुडेच्या भावानं करून दाखवलं, MPSC परीक्षेत कसं मिळवलं यश? Video

