VIDEO: 10व्या मजल्यावरून खाली पडली लिफ्ट, लहान मुलं बाहेर पडली आणि....
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
व्य इमारतींमध्ये विविध सुविधा करण्यात येतात जेणेकरुन राहणाऱ्या लोकांना जास्त त्रास होणार नाही. यातील एक सुविधा म्हणजे लिफ्ट. लिफ्ट जेवढी सोयीस्कर तेवढीच धोकादायकही. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट खराब होते.
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : आजकाल मोठमोठ्या इमारती बनवल्या जात आहेत. त्यामुळे या भव्य इमारतींमध्ये विविध सुविधा करण्यात येतात जेणेकरुन राहणाऱ्या लोकांना जास्त त्रास होणार नाही. यातील एक सुविधा म्हणजे लिफ्ट. लिफ्ट जेवढी सोयीस्कर तेवढीच धोकादायकही. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट खराब होते. यामुळे लोक लिफ्टमध्ये अडकतात, कधी लिफ्टची लाईट जाते. कधी लिफ्ट माणसं वाहून नेऊ शकत नाही. लिफ्टमध्येही अनेक धोकादायक घटना घडतात. असाच एक लिफ्टचा घटनेता भयानक व्हिडीओ समोर आलाय. लिफ्ट अचानक दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळली.
लिफ्ट अचानक दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळली. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असून अंगावर काटा आणणारी घटना आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लिफ्ट खाली कोसळण्याची काही सेकंदापूर्वी दोन मुलं या लिफ्टमध्ये होती. ही घटना पुण्यातून समोर आली आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दोन मुलं लिफ्टमध्ये आहेत. ते एकमेकांशी बोलत आहेत. त्यानंतर लिफ्ट थांबते आणि मुलं त्यांच्या मजल्यावर उतरतात. लिफ्ट बंद होते अचानक लिफ्टमध्ये हलचाल पहायला मिळते. लिफ्ट दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळते. लिफ्ट ओढण्याची वायर तुटल्यानं हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अपघाताच्या वेळी लिफ्ट पूर्णपणे रिकामी असल्याने सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
Pune: Lift fell from 10th floor
◆ The children had come out from inside just a few seconds before the lift fell.
#Pune #PuneLift #viralvideo #Pune pic.twitter.com/AL8tgogfpU
— Harish Deshmukh (@DeshmukhHarish9) July 31, 2023
लिफ्टमध्येच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे भीषण दृश्य कैद झाले असून, ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अवघ्या 47 सेकंदांचा हा व्हिडिओ श्वास रोखणारा आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. हरिश देशमुख नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
advertisement
दरम्यान, लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड, लिफ्ट कोसळणे, लिफ्टमध्ये काहीतरी घडणं, अशा अनेक घटना वारंवार समोर येत असतात. त्यामुळे यापूर्वीही अशा बऱ्याच घटना घडल्या असून चर्चेत आल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 02, 2023 8:53 AM IST









