YouTube वरून तयारी ते वायुदलात झेप, जुन्नर कन्येची गगनभरारी; भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती

Last Updated:

आकाशात झेप घेण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात मात्र त्या स्वप्नांना कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याची जोड मिळाली तरच ते प्रत्यक्षात उतरतात.

+
समृद्धी

समृद्धी ची गगणं भरारी 

पुणे: आकाशात झेप घेण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात मात्र त्या स्वप्नांना कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याची जोड मिळाली तरच ते प्रत्यक्षात उतरतात. जुन्नर तालुक्यातील खोडद (गडाची वाडी) येथील सुकन्या समृद्धी वामन हिने हेच सिद्ध करून दाखवले आहे. कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नसताना, ग्रामीण भागातून येत त्यांनी भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर (ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंग) म्हणून नियुक्ती मिळवली असून, त्याच्या या यशामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवघ्या 23 व्या वर्षी समृद्धीने मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. किल्ले नारायणगडाच्या पायथ्याशी वसलेल्या खोडद गावात त्यांचे बालपण गेले. साधे ग्रामीण वातावरण, मर्यादित सुविधा असूनही आपण संरक्षण दलातच जायचे हा निर्धार लहानपणापासून मनाशी पक्का केला होता. बारावीपर्यंतच त्यांनी आपल्या करिअरची दिशा निश्चित केली आणि पुढे इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. समृद्धीच्या कुटुंबाने त्यांच्या स्वप्नांना नेहमीच भक्कम पाठबळ दिले.
advertisement
आई अरुणा वामन या मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याने शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. वडील अजित वामन हे एलआयसीमध्ये विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आई-वडील, मामा आणि कुटुंबीयांनी प्रत्येक टप्प्यावर समृद्धीला प्रोत्साहन दिले. घरच्यांचा विश्वास आणि पाठिंबा नसता तर हा प्रवास इतका सोपा झाला नसता, असे समृद्धी सांगते. विशेष म्हणजे, वायुदलाच्या परीक्षांसाठी तयारी करताना समृद्धीने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला.
advertisement
युट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओ, ऑनलाइन मार्गदर्शन सत्रे, मॉक टेस्ट आणि अभ्यास साहित्य यांच्या मदतीने त्यांनी स्वतःची तयारी अधिक भक्कम केली. नोकरी सांभाळत असतानाच टाटा पॉवरमध्ये प्रमुख अभियंता म्हणून कार्यरत होती. तरीही वेळेचे काटेकोर नियोजन करत अभ्यास, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक दृढतेवर विशेष भर दिला. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' चित्रपटामुळे मुलींमध्ये वायुदलाबद्दल निर्माण झालेला उत्साह नक्कीच प्रेरणादायी ठरला.
advertisement
मात्र, त्यामागे बालपणापासून मनात असलेली देशसेवेची ओढ अधिक महत्त्वाची होती. मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. योग्य संधी, मार्गदर्शन आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, असे समृद्धी आत्मविश्वासाने सांगते. समृद्धी वामन यांची ही गगनभरारी केवळ वैयक्तिक यश नसून, संपूर्ण जुन्नर तालुक्यासाठी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील असंख्य तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
YouTube वरून तयारी ते वायुदलात झेप, जुन्नर कन्येची गगनभरारी; भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement