गणेशोत्सवासाठी एक खिडकी योजना! पुण्यातील या मंडळांना विनाशुल्क परवानगी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पुणे महापालिकेने 2019 मध्ये गणेशोत्सवाचा मंडप, स्वागत कमानी, रनिंग मंडप यांना परवानगी दिलेली आहे. परवानाधारकांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
पुणे: सर्वांना उत्सुकता लागलेला गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी सार्वजनिक रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात मंडप, मंच, स्वागतद्वार व कमानी उभारल्या जातात. पुण्यातील मंडळांना याबाबत 20219 मध्येच महापालिकेचे परवानगी दिली आहे. आता नवीन मंडळांच्या सोयीसाठी महापालिकेने एक खिडकी योजना जाहीर केली आहे. याठिकाणी मंडळांना विनाशुल्क परवानगी मिळणार आहे.
पुणे महापालिकेने 2019 मध्ये गणेशोत्सवाचा मंडप, स्वागत कमानी, रनिंग मंडप यांना परवानगी दिलेली आहे. ही परवानगी पाच वर्षांच्या कालावधीसाठी ग्राहा धरली जाणार आहे. त्यामुळे परवानाधारकांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्या गणेशमंडळांना परवानगी घ्यायची आहे. त्याच्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये पुणे महापालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त उपक्रमातून विनशुल्क एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे.
advertisement
पुणे महापालिकेची नियमावली
गणेश मंडळांनी 2019 ची कार्यपद्धतीचा अवलंब करून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही. 2019 मध्ये परवानगी घेतली आहे, पण जागा बदलली असेल, तर 2019 च्या कार्यपद्धतीनुसार अशा गणेश मंडळांना नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे.
advertisement
उत्सव मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नसावी. 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारणार असल्यास सुरक्षिततेसाठी अधिकृत स्थापत्य अभियंत्याकडून स्टेबॅलिटी सर्टिफिकेट जोडावे लागेल. मंडप व स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन गाड्या जाण्यासाठी लगतचे रस्ते मोकळे ठेवावेत. पर्यावरण रक्षणासाठी शाडू मातीच्याच मूर्ती वापराव्यात.
advertisement
राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या कायद्याची आणि मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी लागेल. गणेशोत्सव संपल्यानंतर तीन दिवसांच्या आत मंडप, रनिंग कमानी, देखावे, बांधकाम हटवावे. रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटच्या साह्याने बुजवावेत. ध्वनी प्रदूषणाबाबत शासकीय नियमांचे पालन करावे. गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या सर्व परवानग्या मंडप किंवा कमानींच्या दर्शनी भागात प्लॅस्टिक कोटिंगमध्ये लावाव्यात, अशी नियमावली महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान, यंदा गणेशोत्सवात शाडूच्या गणेश मूर्ती वापराव्या. तसेच राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने दिलेल्या प्रदूषण नियंत्रक विषयक कायद्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर यांनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 22, 2024 11:31 AM IST


