Pune: नणंदेनं छळ करायची सीमा गाठली, मयुरीने 6 वर्षांच्या मुलासह इमारतीवरून मारली उडी, पुण्यातील घटना
- Published by:sachin Salve
Last Updated:
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात बुधवारी संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडली. मयुरी देशमुख असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : पुण्यात दोन आठवड्यांपूर्वी नणंदच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना धनकवाडी परिसरात घडली होती. ही घटना ताजी असताना आता आणकी एका विवाहितेनं आपल्या ६ वर्षांच्या मुलासह नणंदेच्या त्रासाला कंटाळून जीवन यात्रा संपवल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात बुधवारी संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडली. मयुरी देशमुख असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. मयुरीही आपल्या पतीसह कल्पक सोसायटीमध्ये राहत होती. मागील काही दिवसांपासून मयुरी देशमुख आणि तिच्या नणंदेसोबत घरगुती कारणावर वाद सुरू होता. तिने वारंवार याबद्दल आपल्या पतीकडे तक्रारही केली होती. पण काहीही उपयोग झाला नाही. आज बुधवारी पुन्हा एकदा मयुरी आणि तिच्या नणंदेमध्ये भांडण झालं. या भांडणानंतर मयुरीने आपल्या ६ वर्षांच्या मुलासह मुलाला घेऊन सोसायटीच्या टेरेसकडे धाव घेतली. काही कळायच्या आता तिने पाचव्या मजल्यावरून सहा वर्षांच्या मुलासह उडी मारून आत्महत्या केली.
advertisement
सोसायटीतील लोकांनी घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाचव्या मजल्यावरून पडून मयुरी आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचेही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, इमारतीवरून उडी मारण्याआधी मयुरीने लिहिलेली चिट्ठी पोलिसांना सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये नंणंदेच्या त्रासाला कंटाळून उडी मारत असल्याचं मयुरीने स्पष्ट उल्लेख केला आहे.
advertisement
आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
June 18, 2025 11:31 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: नणंदेनं छळ करायची सीमा गाठली, मयुरीने 6 वर्षांच्या मुलासह इमारतीवरून मारली उडी, पुण्यातील घटना


