मुंबई, पुण्यात पुन्हा कोसळधार मुसळधार पाऊस; राज्यातील या जिल्ह्यांनाही हवामान खात्याचा इशारा
- Reported by:Shivani Dhumal
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
अतिपावसानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : राज्यभरात बहुतांश ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर पहायला मिळाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच आता राजधानी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच त्याशिवाय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईच्या किनाऱ्यावर समुद्रात उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने, मुंबई महानगराला उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. उद्या मुंबईत कमाल 34°C तर किमान 23°C तापमान असेल.
advertisement
अतिपावसानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी ताम्हणी घाट येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या 48 तासात देखील पुण्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उद्या पुण्यात कमाल 30°C तर किमान 22°C तापमान असेल.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. पंचगंगेने देखील सध्या धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उद्या कोल्हापूरमध्ये कमाल 32°C कमाल तर किमान 21°C तापमान असेल.
advertisement
शहरात घुसले पाणी, काय आहे कोल्हापुरातील पुराची सद्य परिस्थिती? नागरिकांना दिलासा मिळणार का? VIDEO
विदर्भातील, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. याठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूरमध्ये उद्या कमाल 30°C तर किमान 21°C तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वारे वाहणारं असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या कमाल 33°C तर किमान 25°C तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील पाऊस परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jul 26, 2024 8:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबई, पुण्यात पुन्हा कोसळधार मुसळधार पाऊस; राज्यातील या जिल्ह्यांनाही हवामान खात्याचा इशारा








