खासगी शाळेचा मनमानी कारभार; रस्त्यावर अडवल्या गाड्या, हिंजवडी आयटी पार्कमध्ये 3 तास वाहतुकीचा बोजवारा
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
शाळेच्या सहलीसाठी मुलांना सोडण्याकरिता पालकांना संध्याकाळची वेळ देण्यात आली होती. यावेळी शाळेच्या सुरक्षारक्षकांनी थेट रस्त्यावर येत दादागिरीने दोन्ही बाजूकडील वाहनांची वाहतूक थांबवली
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरातून बाहेर पडणाऱ्या मार्गांवर शुक्रवारी सायंकाळी एका खाजगी शाळेच्या गैरव्यवस्थापनामुळे तब्बल तीन तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. विनोदे नगर चौकाजवळील या शाळेने पालकांची वाहने पुढे सोडण्याकरता वारंवार गाड्या अडवल्यामुळे हा खोळंबा झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
शाळा प्रशासनाचा मनमानी कारभार
शाळेच्या सहलीसाठी मुलांना सोडण्याकरिता पालकांना संध्याकाळची वेळ देण्यात आली होती. यावेळी शाळेच्या सुरक्षारक्षकांनी थेट रस्त्यावर येत दादागिरीने दोन्ही बाजूकडील वाहनांची वाहतूक थांबवली. त्यानंतर शाळेच्या बस आणि पालकांच्या मोटारी पुढे सोडण्यात आल्या. या पद्धतीच्या मनमानी कारभारामुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.
advertisement
विकेंडच्या तोंडावर खोळंबा
या कोंडीचा सर्वाधिक फटका आयटी कर्मचाऱ्यांच्या पदरी पडला. भूमकर चौक ते कस्तुरी चौक आणि पुढे हॉटेल परिसरापर्यंत वाहनांची अक्षरश: इंच-इंच गती होती. विकेंडच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे घरी जाणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे आयटी पार्क परिसरातील वाहतूक व्यवस्थापन पुन्हा एकदा निकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
या वाहतूक कोंडीबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी नागरिक आणि पत्रकारांनी वाकड आणि हिंजवडी वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रशासन आणि वाहतूक विभागाने त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 9:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
खासगी शाळेचा मनमानी कारभार; रस्त्यावर अडवल्या गाड्या, हिंजवडी आयटी पार्कमध्ये 3 तास वाहतुकीचा बोजवारा











