Pune Traffic: पुणेकर आता वेळेत घरी पोहोचणार! वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन समितीची स्थापना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सध्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार, ही नवीन समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे: पुणे महानगरपालिका (PMC) हद्दीतील गंभीर वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. सध्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार, ही नवीन समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत बोलताना ही माहिती दिली. सदस्य भीमराव तापकीर यांनी पुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना सामंत बोलत होते.
वाहतूक नियोजन तज्ज्ञ नेमणार
मंत्री सामंत यांनी यावेळी आश्वासन दिलं की, पुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या मुळापासून सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. या अनुषंगाने, वाहतूक नियोजन विभाग आणि त्यासाठी खासगी क्षेत्रातील ट्रॅफिक प्लॅनर नेमण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जी नवीन समिती स्थापन केली जाईल, त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. यामुळे स्थानिक पातळीवरील समस्यांची अचूक माहिती समितीला मिळेल आणि उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
advertisement
या निर्णयामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी
view commentsदरम्यान पुणे–सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नव्या आराखड्यानुसार हा उड्डाणपूल आता हडपसरऐवजी भैरोबा नाल्यापासून सुरू होणार असून थेट यवतपर्यंत सहा पदरी स्वरूपात जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या बदलानुसार सुमारे 39 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. आधीच्या प्रस्तावाच्या तुलनेत सुमारे 4.5 किलोमीटरचा अतिरिक्त विस्तार या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 9:13 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: पुणेकर आता वेळेत घरी पोहोचणार! वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन समितीची स्थापना









