HSRP Update: आता शेवटची संधी, अन्यथा थेट कारवाई होणार, HSRP बाबत महत्त्वाचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
HSRP Update: 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना 'उच्च सुरक्षा पाटी' (एचएसआरपी) नंबरप्लेट बसविणे बंधनकारक आहे. आता राज्य परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुणे : राज्य परिवहन विभागाने 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना 'उच्च सुरक्षा पाटी' (एचएसआरपी) नंबरप्लेट बसविण्यासाठी पुन्हा अडीच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता वाहनधारकांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याची संधी मिळणार आहे. मात्र, ही मुदतवाढ अंतिम असून 1 डिसेंबरपासून नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकांकडून कडक कारवाई होणार असल्याचा इशारा परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक आहे. यासाठी पाच महिन्यांपासून मोहिम राबविली जात असूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने आता चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पुण्यातील परिस्थिती पाहता सध्या 26 लाखांहून अधिक वाहनांना ही नंबरप्लेट बसवायची आहे. रोझमार्टा कंपनीला हे काम सोपविण्यात आले असून, फिटमेंट केंद्रांवर प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
19 लाख वाहनांवर अजूनही नंबरप्लेट नाही
सध्या फक्त पावणे आठ लाख वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेटसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी साडेपाच लाखांनी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. तरीही तब्बल 19 लाख वाहनधारकांनी नोंदणी केलेली नाही. ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनाही सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंतची तारीख दिली आहे. त्यामुळे प्रक्रिया मंद गतीने सुरू आहे.
advertisement
राज्यातील केवळ 15 ते 17 टक्के वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट लावली आहे. अनेकांना 15 ऑगस्टपर्यंत नंबरप्लेट बसविणे शक्य झाले नाही. ग्रामीण भागात फिटमेंट केंद्रांची संख्या कमी आहे. काही फिटमेंट केंद्र बंद झाल्याने मागणी वाढली आहे.
लगेच बसवून घ्या नंबर प्लेट
view commentsआता 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत असल्याने वाहनधारकांनी तत्काळ नोंदणी करून नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे परिवहन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. 1 डिसेंबरपासून नियमभंग करणाऱ्यांवर दंडासह कडक कारवाई होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 15, 2025 2:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
HSRP Update: आता शेवटची संधी, अन्यथा थेट कारवाई होणार, HSRP बाबत महत्त्वाचं अपडेट


