Indigo Crisis: इंडिगोच्या गोंधळामुळे हवाई प्रवाशांची लूट! पुणे-मुंबई तिकीट दर चक्क 1 लाखावर, या मार्गांवरही दरवाढ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या पुणे-मुंबई या एकाच उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत
पुणे : इंडिगो एअरलाईन्सच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा थेट परिणाम देशभरातील हवाई प्रवासावर झाला आहे. याचा गैरफायदा घेत इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. प्रवाशांची वाढलेली मागणी आणि मर्यादित उड्डाणांमुळे अनेक मार्गांवरील भाडे गगनाला भिडले आहेत.
मुंबई-पुणे मार्गावर दर लाखांवर
सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या पुणे-मुंबई या एकाच उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे, नागपूर-मुंबई या मार्गावरील विमानांसाठी देखील ३० हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे समोर आलं आहे. पुणे-मुंबई आणि नागपूर-पुणे या मार्गांवरील दरही याच दरम्यान ३० हजार रुपयांच्या वर गेले आहेत.
advertisement
46 उड्डाणे रद्द, प्रवाशांमध्ये गोंधळ
गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले असून, पुणे विमानतळाला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शुक्रवारी इंडिगोची एकूण ४६ उड्डाणे रद्द झाली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळूरू, रांची यांसारख्या शहरांतून पुणे येथे येणाऱ्या २३ आणि पुण्याहून बाहेरील राज्यांमध्ये जाणाऱ्या २३ उड्डाणांचा समावेश होता. अनेक उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
विविध प्रवास संकेतस्थळांच्या आढाव्यातून हे स्पष्ट झालं आहे की, इंडिगोच्या विमानांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे इतर कंपन्यांनी मिळणाऱ्या संधीचा फायदा घेत तिकीट दरात ही प्रचंड वाढ केली आहे. ज्यामुळे सामान्य प्रवाशांचे मोठे आर्थिक शोषण होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2025 12:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Indigo Crisis: इंडिगोच्या गोंधळामुळे हवाई प्रवाशांची लूट! पुणे-मुंबई तिकीट दर चक्क 1 लाखावर, या मार्गांवरही दरवाढ


