Jayant Patil : प्रफुल्ल पटेल-शरद पवार यांचा व्हायरल फोटो! जयंत पाटील यांनी सांगितलं सत्य
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jayant Patil : शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.
पुणे, 24 सप्टेंबर (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची नुकतीच नव्या संसद भवनाच्या कॅफेटेरिया येथे भेट झाली होती. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासोबत फोटो काढलेला. तसेच पटेल यांनी हा फोटो सोशल मीडियावरही शेअर केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं. यावर आता शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील गणेशोत्सवासाठी पुण्यात आले होते. त्यांनी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले जयंत पाटील?
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या फोटोबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, संसदेच अधिवेशन असताना अनेक खासदार एकत्र भेटतात. फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नसेल म्हणून काढला असेल, असा टोला त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना लगावला. त्याचवेळी उद्योगपती अडाणी यांच्यासोबतच्या फोटोवरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अडाणी यांनी नवा उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या उद्घाटनाला पवार गेले यात गैर काय? तो प्रकल्प काही आपल्या राज्यातून गेलेला नाही. त्यांना नवा प्रकल्प साहेबांना दाखवायचा असेल. पवार साहेब इंडियामध्ये काम करतात. त्यात काही शंका घेऊ नये, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
advertisement
मी दरवर्षी दर्शनाला येतो. गणेश ही विद्येची देवता आहे. आमच्या पक्षाला नेहमीच आशीर्वाद मिळतात. आहे तो पक्ष वाढवण्यासाठी आशीर्वाद मागणार आहे. आज एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे. मी माझी इच्छा गणरायाच्या कानात बोलून दाखवेल. सध्या राज्यात दुष्काळाचा पक्ष गंभीर आहे, मात्र सरकार लक्ष देत नाही.
वाचा - मोठी बातमी! आरक्षणासाठी पुण्यात सकल मराठा समाजाकडून महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती
मला राष्ट्रीय पक्षाबद्दल माहिती नाही. नागालँड सरकार स्थापन होताना सगळे आमदार सरकारमध्ये गेले आहेत. त्यांनी भाजपशी आधीच सलगी केली आहे. अजित पवारांनी जे केलं त्याचा काही संबंध नाही. त्यानी आधीच भाजपला पाठींबा दिला आहे.
advertisement
रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर..
तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का?आम्ही ठरवू. लोकशाहीत पोस्टर कुणीही लावू शकतं. समर्थक कुणाला कुठही नेऊन बसवतात. पवार साहेब यांच्याकडे जे नेते अहेत, त्याच्याकडे मुख्यमंत्री व्हावे असे अनेक नेते आहेत. अनेकांचे फ्लेक्स लागतात आता अजुन एक लागला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 24, 2023 5:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Jayant Patil : प्रफुल्ल पटेल-शरद पवार यांचा व्हायरल फोटो! जयंत पाटील यांनी सांगितलं सत्य