Pune Crime: कुटुंब विठ्ठलाच्या दर्शनाला गेलं; अन् इक़डे भलतंच घडलं, घराचा दरवाजा उघडताच हादरला शेतकरी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मंगळवारी मध्यरात्री दोन संशयित तरुण एका दुचाकीवरून परिसरात 'रेकी' करताना दिसून आले आहेत.
नारायणगाव: कुटुंबासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे एका शेतकरी कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथे बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला आणि सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी (१७ डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
नेमका प्रकार काय?
वारूळवाडी येथील रहिवासी अनिकेत डोंगरे हे मंगळवारी आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील कटरच्या साहाय्याने कापले. चोरट्यांनी कपाटातील सहा तोळे सोन्याचे दागिने, सव्वा किलो चांदी आणि ६० हजार रुपयांची रोकड असा एकूण पावणेचार लाखांहून अधिक किमतीचा ऐवजी चोरून नेला.
advertisement
Pune News: लग्नाची एवढी घाई! खोटं वय सांगून आळंदीत उरकला विवाह, सासऱ्याचीच जावयाविरोधात पोलिसांत धाव
शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला: डोंगरे यांच्या घरात हातसफाई केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारील सागर भागवत आणि सोलाट यांच्या घराकडे वळवला. मात्र, भागवत यांच्या घरातील सदस्यांना आवाजामुळे जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा केला. यामुळे चोरटे घाबरले आणि त्यांनी तेथून पळ काढला, ज्यामुळे पुढील मोठी चोरी टळली.
advertisement
सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद: नारायणगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मंगळवारी मध्यरात्री दोन संशयित तरुण एका दुचाकीवरून परिसरात 'रेकी' करताना दिसून आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या तपासात सामील झाले असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 8:24 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: कुटुंब विठ्ठलाच्या दर्शनाला गेलं; अन् इक़डे भलतंच घडलं, घराचा दरवाजा उघडताच हादरला शेतकरी








