Pune Traffic: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, 2 दिवस 'या' मार्गांवर प्रवेश बंदी, पाहा पर्यायी रस्ते
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune Traffic: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
पुणे: भीमा-कोरेगाव येथील पेरणे फाटा येथे 1 जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभावर शौर्य दिन व अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर पुणे - नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत असतील.
पुणे, मुंबई व सोलापूर मार्गांवरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग
पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने खराडी बाह्यवळण मार्गाने मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे–सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा व शिरूर मार्गे नगर रस्त्याकडे वळविण्यात आली आहेत.
पुणे–सोलापूर रस्त्याने आळंदी व चाकणकडे जाणारी वाहने हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गाने विश्रांतवाडी मार्गे पुढे जाणार आहेत.
मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर व आळेफाटा हा मार्ग निश्चित करण्यात आला असून, हलक्या वाहनांसाठी वडगाव मावळ, चाकण, खेड, पावळ व शिरूर मार्ग सुचविण्यात आला आहे.
advertisement
कोल्हापूर, सांगली आणि सातारा बाजूकडून कात्रजमार्गे येऊन मंतरवाडी फाटा व मगरपट्टा चौकमार्गे नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसरमार्गे केडगाव चौफुला गाठून पुढे शिरूरच्या दिशेने प्रवास करावा.
इंद्रायणी नदीवरील आळंदी–तुळापूर पूल जड वाहनांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून, या पुलावरून केवळ हलक्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच विश्रांतवाडी व लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जड वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.
advertisement
अवजड वाहनांना बंदी
शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. लोणी काळभोर येथील थेऊर फाटा, खडकीतील हॅरिस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, सिंहगड रस्त्यावरील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशिन चौक, फुरसुंगी येथील मंतरवाडी फाटा आणि मरकळ पूल या मार्गांवरून शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी आहे.
advertisement
वाहने पार्किंगसाठी जागा
view commentsलोणीकंद येथील आपले घर परिसर, बौद्ध वस्ती व तुळापूर फाटा (स्टफ कंपनीजवळ) येथे मोटारी व हलक्या चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे. दुचाकी वाहनांसाठी आपले घर शेजारील वाहनतळ, मोनिका हॉटेलजवळ व रौनक स्वीटजवळ जागा उपलब्ध आहे. बस व टेम्पोसाठी थेऊर रस्त्यावरील खंडोबाचा माळ, आपले घर सोसायटीजवळील मोकळी जागा, पेरणे गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मैदान तसेच ज्ञानमुद्रा व सोमवंशी अकॅडमी परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 8:32 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, 2 दिवस 'या' मार्गांवर प्रवेश बंदी, पाहा पर्यायी रस्ते











