पुणे तिथे काय उणे! रात्रीचे दीड वाजले; विमानतळावर प्रवाशांची गर्दी अन् अचानक बिबट्या पोहोचला धावपट्टीवर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे विमानतळावरून विमानांची मोठ्या प्रमाणात रात्रीही वाहतूक सुरू असते. त्यामुळे रात्रीच्या वेळीही इथे लोकांची गर्दी पाहायला मिळते
पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना मागील बऱ्याच काळापासून समोर येत आहेत. या हल्ल्यांमध्ये काहींनी आपला जीवही गमवला आहे. ग्रामीण भाग किंवा दाट लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर अनेकदा पाहायला मिळतो. मात्र, आता पुण्यातून एक अजब घटना समोर आली आहे. यात बिबट्या थेट विमानतळावरच पोहोचला.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास पुन्हा बिबट्या दिसला आहे. पुणे विमानतळावरून विमानांची मोठ्या प्रमाणात रात्रीही वाहतूक सुरू असते. त्यामुळे रात्रीच्या वेळीही इथे लोकांची गर्दी पाहायला मिळते. अशात आता प्रवशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इथे गेल्या दोन दिवसांत दोन वेळा बिबट्याचे दर्शन घडलं आहे.
टॅक्सी वे क्रमांक के -4 इथे हा बिबट्या दिसला. बिबट्या ज्या ठिकाणी आढळून आला, त्या ठिकाणाहून काही अंतरावरच पार्किंग बे क्रमांक 8, 9 आणि 10 आहेत. रात्रीच्या वेळी या तिन्ही ठिकाणी विमानं थांबली होती. मात्र, सुदैवानं बिबट्या धावपट्टीवर आला नाही. हा बिबट्या याच आठवड्यात दोनदा धावपट्टीजवळ आढळून आला आहे. मंगळवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री बिबट्या टॅक्सी वे - ४च्या परिसरात आढळून आला.
advertisement
सर्वांत आधी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला हा बिबट्या दिसला. त्यानंतर गुरुवारी ग्राउंड स्टाफच्या काही कर्मचाऱ्यांना तो दिसला. वन विभागाने याआधीच विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असणाऱ्या विमानतळाच्या संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यासंदर्भात कळवलं आहे. मात्र, अद्याप ही भिंत तशीच आहे. विमानतळ प्रशासनाने या पत्राची दखल घेतलेली नाही. त्याच भिंतीमधून बिबट्या विमानतळाच्या आत दाखल झाला असल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे.
advertisement
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याला पकडण्यासाठी लोहगावच्या परिसरात पिंजरे लावले आहेत. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्यावर नजरही ठेवली जात आहे
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 22, 2025 10:50 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे तिथे काय उणे! रात्रीचे दीड वाजले; विमानतळावर प्रवाशांची गर्दी अन् अचानक बिबट्या पोहोचला धावपट्टीवर


