Pune Crime: तरुणीने केला प्रेमविवाह; भावकीला बघवेना, सासरच्या घरी जात केलं धक्कादायक कृत्य
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सोनवणे यांच्या मुलाने आरोपींच्या नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहानंतर आरोपी अत्यंत संतप्त झाले होते.
पुणे : तरुणीने प्रेमविवाह केला याचा राग नात्यातील काहींच्या डोक्यात होता. याच रागातून त्यांनी तरुणाच्याच वडिलांच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करत खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर भागात घडली आहे. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने आठ आरोपींना अटक केली आहे.
अरुण छबु सोनवणे (वय ४०, रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली असं या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सोनवणे यांच्या मुलाने आरोपींच्या नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहानंतर आरोपी अत्यंत संतप्त झाले होते. याच कारणावरुन राग डोक्यात धरून शनिवार (२२ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपींनी थेट अरुण सोनवणे यांचं घर गाठलं.
advertisement
सोनवणे यांना शिवीगाळ करत आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींपैकी शेखर चव्हाण याने अरुण सोनवणे यांच्या डोक्यात लोखंडी गजाने वार केला. या हल्ल्यात सोनवणे गंभीर जखमी झाले. सोनवणे यांचा मुलगा मध्यस्थी करण्यासाठी आल्यानंतर आरोपींनी त्यालाही मारहाण केली.
advertisement
आठ जणांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर लोणी काळभोर पोलिसांनी अरुण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि दहशत माजविण्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. राज दादा शितोळे, शेखर दिलीप चव्हाण, रोशन दिलीप चव्हाण, दिलीप पंडीत चव्हाण, आईनाबाई दिलीप चव्हाण, पूजा दिलीप चव्हाण, मनीषा दादा शितोळे, उज्ज्वला सावंत (सर्व रा. थेऊर, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पोलीस उपनिरीक्षक बिराजदार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रेमविवाहानंतर झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे थेऊर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 24, 2025 1:47 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: तरुणीने केला प्रेमविवाह; भावकीला बघवेना, सासरच्या घरी जात केलं धक्कादायक कृत्य


