Suraj Chavan : अजितदादांचा वादा पूर्ण! सूरज चव्हाणचं घर पूर्ण होताच दिली पहिली प्रतिक्रिया! काय म्हणाले?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ajit Pawar Reaction on Suraj Chavan house : सुरज चव्हाण याने गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला. त्यावर अजित पवार यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar On Suraj Chavan house : महाराष्ट्राचा प्रसिद्ध रीलस्टार आणि बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण याने अखेर आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्यासाठी मदत केली होती. काही दिवसांआधी सूरज चव्हाणने अजित पवार यांची भेट घेऊन त्यांने आभार मानले होते. त्यानंतर आता काही दिवसांतच सूरज चव्हाणने त्याच्या नव्या घरी गृहप्रवेश केला आहे. त्यावर देखील अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आज मी माझ्या नवीन घराचा गृहप्रवेश केला, असं म्हणत सुरज चव्हाण याने व्हिडीओ शेअर केला. त्यावर अजित पवार यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. सुरज, नवीन घरासाठी आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा, असं अजित पवार सुरज चव्हाणच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाले आहेत.
advertisement
सुरज चव्हाणचं आलिशान घर
सुरज चव्हाणने देखील अजित पवार यांचे आभार मानले आहेत. सुरज चव्हाणच्या घरातील मोठ्ठा हॉल, त्यालगत मॉड्युलर किचन, प्रशस्त मोकळी जागा आणि हायटेक फ्लोरिंग पाहून अनेकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं आहे. मोठ्या खिडक्या, चकचकीत काचा आणि हाय सीलिंग असल्याने संपूर्ण बंगला अधिक आलिशान दिसतोय. तसेच प्रशस्त खोल्या अन् मोठं अंगण देखील असल्याने सुरजच्या चेहऱ्यावरचं तेज अधिक प्रखरतेने दिसून येत आहे.
advertisement
सुरज चव्हाणचा प्रवास
दरम्यान, एक साधा रीलस्टार ते बीग बॉसचा विजेता असा प्रवास सुरज चव्हाणचा राहिलाय. बिग बॉसचं विजेतेपद हे त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलं. तरी देखील त्याच्याकडे स्वतःचं घर नव्हतं. अखेर वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याचं स्वप्न पूर्ण झालं. या काळात सुरजला अनेकांनी मदत देखील केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 18, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Suraj Chavan : अजितदादांचा वादा पूर्ण! सूरज चव्हाणचं घर पूर्ण होताच दिली पहिली प्रतिक्रिया! काय म्हणाले?


