दरात पुन्हा ऊसळी! पिवळ्या सोयाबीनच्या आवकेत वाढ, आजचं मार्केट काय?

Last Updated:

Today Soyabean Market Update : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून दरांमध्ये चढ-उतार दिसून आला आहे.

soybean market
soybean market
मुंबई : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून दरांमध्ये चढ-उतार दिसून आला आहे. काही ठिकाणी सोयाबीनने 5 500 ते 6,000 रुपयांचा उच्चांक गाठला तर काही बाजारात 1,500 ते 3,000 रुपयांच्या किमान दर मिळाला
मुरुम बाजार समितीत 361 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. किमान दर 3,500 रुपये तर जास्तीत जास्त 4,431 रुपये नोंदवले गेले. सरासरी दर 4,120 रुपये राहिला.
अहिल्यानगर, लासलगाव, शहादा, नांदेड, चंद्रपूर, पुसद, पाचोरा, कारंजा, परळी-वैजनाथ या बाजारांमध्येही मोठी खरेदी-विक्री झाली. कारंजामध्ये तब्बल 15,000 क्विंटल आवक नोंदली गेली.
धुळे, पिंपळगाव, सोलापूर, अमरावती, जळगाव, नागपूर, हिंगोली या बाजारांमध्येही हायब्रीड आणि लोकल सोयाबीनचे दर चांगल्या पातळीवर राहिले. जळगावमध्ये लोकल सोयाबीनचा जास्तीत जास्त दर 4,600 रुपये, तर अमरावतीत 4,600 रुपये नोंदवला गेला.
advertisement
पिवळ्या सोयाबीनच्या आवकेत वाढ 
लातूर, जालना, अकोला, यवतमाळ या बाजारांत पिवळ्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली. लातूरमध्ये तब्बल 18,652 क्विंटल सोयाबीन आले. जालना बाजारात जास्तीत जास्त दराने मोठी उसळी घेत 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वोच्च दर नोंदवला गेला. अकोला बाजारातही दर 5,650 रुपयांपर्यंत पोहोचले.
वाशीम, वर्धा, दिग्रस, वरूड, लोणार, निलंगा, औराद, मंगरुळपीर, घाटंजी, उमरखेड, राजूरा या विविध बाजार समित्यांमध्ये दर 3,000 ते 5,900 रुपयांच्या दरम्यान राहिले. विशेषत: मंगरुळपीर बाजारात जास्तीत जास्त 5,900 रुपये, तर उमरखेडमध्ये 4,700 रुपये दर मिळाला.
advertisement
काही बाजारांत मात्र दर अपेक्षेपेक्षा कमी राहिले. वरोरा-शेगाव बाजारात किमान दर 1,500 रुपये, तर भद्रावतीत 1,600 रुपये नोंदवला गेला, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.
दरम्यान, राज्यातील सोयाबीन बाजार सध्या मिश्र स्थितीत असून काही ठिकाणी दर वाढत असताना काही भागात घसरण दिसत आहे. पुढील आठवड्यातील आवक आणि हवामानाची स्थिती यावर दरांचा कल अवलंबून राहणार आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
दरात पुन्हा ऊसळी! पिवळ्या सोयाबीनच्या आवकेत वाढ, आजचं मार्केट काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement