Kunbi Record: राज्य सरकारचा एक आदेश अन् मोडी अभ्यासकांना सोन्याचे दिवस, नेमकं घडलं काय?
- Reported by:Niranjan Sherkar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Maratha Reservation: मराठा समाजला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी कुणबी म्हणून दाखल झालेल्या नोंदी महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यासाठी मोडी अभ्यासकांना चांगले दिवस आले आहेत.
पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ‘कुणबी’ म्हणून दाखल झालेल्या नोंदी महत्त्वाच्या ठरत आहेत. जुन्या दप्तरांपासून जमीन अभिलेख, देवस्थान व दवाखाने यांचे वडिलोपार्जित कागदपत्रे शोधून काढण्याची प्रक्रिया सध्या गतीमान झाली आहे. विशेष म्हणजे या नोंदींपैकी मोठ्या प्रमाणात दस्तऐवज मोडी लिपीत असल्याने अभ्यासकांसमोर संशोधनाची नवी दारे खुली झाली आहेत. याबाबत अधिक माहिती मोडी लिपी अभ्यासक प्रा. बाबासाहेब दूधभाते यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली.
गेल्या अनेक शतकांपासून महाराष्ट्राच्या कारभाराची अधिकृत भाषा म्हणून वापरली गेलेली मोडी लिपी पुढे विस्मरणात गेली होती. पण आता कुणबी समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या लिपीतील दप्तरांवर संशोधन सुरू झाले असून मोडी अभ्यासकांना नवा सुवर्णकाळ लाभला आहे.
Kunbi Certificate: 21 ते 45 दिवसांत मिळेल कुणबी प्रमाणपत्र, कसा आणि कुठे करायचा अर्ज? संपूर्ण माहिती
advertisement
देवस्थानांच्या दान नोंदी, वाडवडिलांच्या जमिनी विक्रीखरेदीचे हुकुमनामे, तसेच गहाळ झालेल्या दस्तऐवजांची उकल करण्यासाठी मोडी लिपी वाचनाची मागणी झपाट्याने वाढली आहे. प्रत्येक तहसील कार्यालयातील नोंदी तपासल्या जात असून गावोगावी जुन्या घरात साठवलेली दस्तऐवजांची दप्तरं काढून तपासणी केली जात आहे. शासनाने या कागदपत्रांचे पडताळणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोडी लिपी अभ्यासकांना मोठी संधी उपलब्ध
advertisement
मोडी लिपी अभ्यासकांना ही एक मोठी संधी आहे. विस्मृतीत गेलेल्या लिपीचे वाचन, अभ्यास व प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूरसारख्या ठिकाणी मोडी लिपीचे विशेष वर्ग सुरू झाले आहेत. अनेक विद्यार्थी, संशोधक आणि तरुण आता या लिपीचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 14, 2025 4:14 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Kunbi Record: राज्य सरकारचा एक आदेश अन् मोडी अभ्यासकांना सोन्याचे दिवस, नेमकं घडलं काय?








