Pune Crime: दारु पार्टीला गेला अन् रक्ताच्या थारोळ्यात पडला, पुण्यात तरुणासोबत घडलं भयंकर

Last Updated:

Pune Crime News: पुण्यात दारु पार्टीला गेलेल्या एका तरुणासोबत भयंकर कांड घडला आहे. दारु पित असताना अचानक घडलेल्या एका घटनेमुळं तरुण गंभीर जखमी झाला आहे.

News18
News18
पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीला दारु पार्टीत जाणं चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरुण आपल्या एका मित्रासह दारु पार्टी करायला गेला होता. मात्र दारू पार्टीत पिस्तूल हाताळताना चुकून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एक इन्स्टंट एजंट गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली.
प्रदीप सावंत असं जखमी झालेल्या 39 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. या गोळीबारानंतर त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पिस्तूल हाताळताना अचानक गोळी सुटल्यामुळे हा प्रकार घडला. घटनास्थळी दोनजण दारू पार्टी करायला गेले होते. यावेळी अनिल चव्हाण नावाच्या व्यक्तीने गावठी पिस्तूल आणलं होतं. दारु पित असताना आरोपी पिस्तूल हातळत होता. यावेळी अचानक चुकून गोळी सुटली. ज्यात प्रदीप गंभीर जखमी झाला.
advertisement
या अपघातानंतर सुरुवातीला जखमी प्रदीपने हा प्रकार अनावधानातून घडल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि मिळालेल्या पुराव्यांमुळे पिस्तूल हाताळणीची चूक उघडकीस आली आहे. याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करत अनिल चव्हाणला अटक केली आहे.
आरोपी चव्हाणकडे गावठी पिस्तूल कसं आलं, याची चौकशी पोलीस करत आहेत. बेकायदेशीर पिस्तूल आणणे आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर पिस्तूल हाताळणीसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: दारु पार्टीला गेला अन् रक्ताच्या थारोळ्यात पडला, पुण्यात तरुणासोबत घडलं भयंकर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement