मी लोकसभेला चूक केली ती पवार गटाने आता केली, असं करायला नको होतं, अजितदादा काय म्हणाले?
- Published by:Suraj
Last Updated:
राष्ट्रवादीत फुटीनंतर पुतण्या अजित पवार यांना विधानसभेत शह देण्यासाठी काका शरद पवार यांनी अजित पवारांच्याच पुतण्याला उमेदवारी दिलीय.
बारामती : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. नेत्यांकडून विरोधकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. आज अनेकांनी अर्ज दाखल केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून अर्ज भरला. सातव्यांदा ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. अजित पवार यांनी बारामतीत शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला. राष्ट्रवादीत फुटीनंतर पुतण्या अजित पवार यांना विधानसभेत शह देण्यासाठी काका शरद पवार यांनी अजित पवारांच्याच पुतण्याला उमेदवारी दिलीय.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी म्हटलं की, बारामतीत मी चांगल्या मतांनी विजयी होईन. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. लोकसभेला पत्नीला उभा करून मी चूक केली. आता तीच चूक विधानसभेला युगेंद्रला उभा करून शरद पवार गटाने केली आहे.
मी माझ्या पत्नीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उतरवलं होतं. आमची ती चूक होती. यावेळी त्यांनीही तीच चूक केलीय. आता बारामतीची जनता ठरवेल असंही अजित पवार म्हणाले. युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिलीय. तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनी असं करायला नको होतं. पण त्यांनी चूक केलीय. आता मतदार याबद्दल योग्य निर्णय घेतील असं अजित पवार यांनी म्हटलं.
advertisement
अजित पवार यांच्याविरोधात बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार यांनीही अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे लहान भाऊ श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. युगेंद्र पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांच्या मताधिक्क्याने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. २०१९च्या विधानसभेला अजितदादा 1 लाख 65 हजारांच्या लीडने जिंकले होते. पक्ष फुटीनंतर मात्र याच बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया ताईंना 48 हजारांचे मताधिक्य देऊन एकप्रकारे अजितदादांच्याच विरोधात कौल दिल्याचं बोललं जातंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 28, 2024 2:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मी लोकसभेला चूक केली ती पवार गटाने आता केली, असं करायला नको होतं, अजितदादा काय म्हणाले?








