उद्धव ठाकरे मविआमध्ये कुणाचं ऐकत नाहीत का? शरद पवार पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

Last Updated:

महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे हट्ट करतात का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता एखाद्याचा स्वभाव असतो असं त्यांनी म्हटलं.

News18
News18
चंद्रकांत फुंदे, पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला तर मविआने बाजी मारली. मात्र विधानपरिषदेत मविआला फटका बसला. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी मतांचे गणित जुळत नसतानाही तिसरा उमेदवार मैदानात उतरवला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत हट्ट करतात का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. उद्धव ठाकरेंसदर्भात विचारलेल्या या प्रश्नाला शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत हट्ट करतात, कोणाचं ऐकत नाहीत का अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या हट्टाबाबत विचारताच शरद पवार म्हणाले की, थोडा स्वभाव असतो एखाद्याचा. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या हितासाठी आग्रही भूमिका घेत असतो. थोडं अॅडजस्ट करावं लागतं. आघाडी आहे म्हटल्यावर या गोष्टी पचवाव्या लागतात कारण लोकांसमोर एकञितपणे निवडणुकीला सामोरं जायचं आहे. थोडंफार इकडं तिकडं चालू राहतं.
advertisement
जयंत पाटलांच्या उमेदवारीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत एकमत असं झालं नव्हतं. पण तरीही माझ्या मनात डाव्यांना कुठेतरी संधी मिळाली हे होतं म्हणून माझ्या पक्षाची त्यांना देऊ केली होती ठाकरेंनी त्यांचा उमेदवार दिला. काँग्रेसची दोन नंबरची मतं निम्मी सेना आणि जयंत पाटलांना द्यावीत असं माझं मत होतं..तसं झालं असतं तर मविआचे तिन्ही उमेदवार जिंकले असते असं मला वाटतं पण ते काही जमून आलं नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं.
advertisement
भुजबळांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया
आरक्षणासंदर्भात भुजबळांनी भेट घेतली त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिलं हे मला माहिती नाही. पण आज राज्यात शांततेची गरज आहे. माझ्या मनात याबद्दल काही शंका नाही. शांतता निर्माण व्हायलाच हवी या मताचा मी आहे. जरांगे यांच्यासोबत सरकारने संवाद साधला असेल तर त्यात विरोधकांचं काम काय? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. सत्ताधाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीवरून केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. विरोधकांना बाजूला ठेवंल आणि आता विचारतायत अशा शब्दात शरद पवार यांनी टोला लगावला.
मराठी बातम्या/पुणे/
उद्धव ठाकरे मविआमध्ये कुणाचं ऐकत नाहीत का? शरद पवार पहिल्यांदाच स्पष्ट बोलले
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement