पुणेकरांना मोठा दिलासा! दमदार पावसानं पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं पुण्यावर पाणीकपातीचं मोठं संकट होतं. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलंय. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीनं वाढ झालीये. शिवाय पुढेही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीबाबत आता दिलासा मिळणार आहे.
धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं पुण्यावर पाणीकपातीचं मोठं संकट होतं. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू आहे. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होऊ शकते. म्हणूनच तूर्तास पाणीकपात केली जाणार नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
advertisement
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीनं वाढ झाल्याची माहिती दिली. तसंच तूर्तास पाणीकपात केली जाणार नाही, असंही स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांतील पाणीसाठा जवळपास 3.50 टीएमसी एवढा खाली गेला होता. त्यामुळे पुणे शहरावर पाणीकपातीचं संकट होतं. परंतु गेल्या 5 ते 6 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चागंला पाऊस झालाय. त्यामुळे नदी, ओढ्यांमधून धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होतंय. परिणामी जलसाठ्यात पाऊण टीएमसी पाण्याची वाढ झालीये. मात्र तूर्तास पाणीकपातीचं संकट जरी टळलं असलं, तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 08, 2024 9:13 AM IST