Pune News : दिवाळीपूर्वी प्रवाशांना एसटीची मोठी भेट, करता येणार मनसोक्त प्रवास

Last Updated:

Diwali Special St Buspass Travel Freely : दिवाळीपूर्वी महाराष्ट्र एसटीने प्रवाशांसाठी मोठा आनंद देत मनसोक्त प्रवासाची संधी दिली आहे. आता प्रवासी राज्यभर एसटीच्या सर्व मार्गांवर अनलिमिटेड प्रवास करू शकतात.

बस 
बस 
पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गावी जाणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशा काळात प्रवाशांना आर्थिक दिलासा देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आवडेल तेथे प्रवास योजनेत भाडेकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना कमी दरात प्रवासाची सुविधा मिळणार असून या योजनेत इलेक्ट्रिक बसचाही समावेश करण्यात आला आहे.
आवडेल तेथे प्रवास योजना ही एसटी प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत प्रवासी चार किंवा सात दिवसांच्या कालावधीत राज्यातील कोणत्याही भागात अमर्याद प्रवास करू शकतात. या पासमुळे प्रवाशांना दरवेळी वेगळे तिकीट काढण्याची गरज भासत नाही आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते. मात्र, आधी या योजनेतील काही अटींमुळे आणि उच्च दरांमुळे अनेकांना या सुविधेचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे महामंडळाने आता दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असून या बदलामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
नवे दर जाहीर
या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या बससाठी सवलतीचे नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. साध्या आणि जलदगती बससाठी 1814 रुपयांचा पास आता 1364 रुपयांना मिळणार आहे. शिवशाही बसच्या प्रवासासाठी चार दिवसांचा पास 2533 रुपयांवरून 1818 रुपयांना करण्यात आला आहे तर इलेक्ट्रिक बससाठीचा पास 2072 रुपयांवरून 1433 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांपासून पर्यटनप्रेमींपर्यंत सर्वांना या भाडेकपातीचा लाभ मिळणार आहे.
advertisement
आवडेल तेथे प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही एसटी बसस्थानकातील पास खिडकीवर जाऊन आवश्यक रक्कम भरून पास काढावा लागतो. त्यानंतर प्रवाशाला ओळखपत्रासह पास दिला जातो. हा पास चार किंवा सात दिवस वैध असतो आणि त्या कालावधीत कोणत्याही बसने राज्यभर मुक्तपणे प्रवास करता येतो.
स्वारगेट आगाराचे व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी सांगितले की, भाडेकपातीमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : दिवाळीपूर्वी प्रवाशांना एसटीची मोठी भेट, करता येणार मनसोक्त प्रवास
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement