Pune Metro News : पुण्यात मेट्रो स्थानकाच्या पाच मीटर परिसरात TOD झोन, नेमका प्लॅन काय?

Last Updated:

Pimpri-Chinchwad Metro :पिंपरी-चिंचवड मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिघात टीओडी झोन निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेने सल्लागार संस्थेची नेमणूक केली असून नऊ महिन्यांत आराखडा तयार करून शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.

News18
News18
पिंपरी : पुणे सह पिंपरी- चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाच्या गेल्या काही दिवांसापासून कामांना गती मिळत आहे. मात्र त्यासोबत मेट्रोमुळे प्रवास सुलभ होण्याबरोबरच स्थानकांच्या परिसरात विकासाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिसर 'ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट झोन’ म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चला तर हा नेमका प्लॅन कसा असेल त्या बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
मेट्रो परिसराचा होणार कायापालट!
या प्लॅन अंतर्गत वाहतूक, दळणवळण, नवीन बांधकामे, पार्किंग, गर्दीचे व्यवस्थापन आणि शहरी विकासाचे नियोजन नीट होण्यासाठी स्वतंत्र प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यास मान्यता दिली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून हे काम महापालिकेचा विद्यमान विकास आराखडा तयार करणाऱ्या ‘एससीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट’ या संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. या संस्थेमार्फत पुढील नऊ महिन्यांत सविस्तर नियोजन आराखडा तयार करून सादर केला जाणार आहे.
advertisement
दरम्यान महापालिकेच्या नगररचना विभागाने नुकताच प्राथमिक विकास आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यावर हजारो नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत. या आराखड्यात मेट्रो स्थानकांच्या आसपास टीओडी झोनचा समावेश अपेक्षित होता. मात्र, तो न केल्याने आता स्वतंत्ररीत्या नवा आराखडा तयार करावा लागत आहे. नगररचना विभागाच्या या दुर्लक्षामुळे प्रशासनाला पुन्हा सल्लागार संस्थेची नेमणूक करून नवे नियोजन करावे लागणार आहे.
advertisement
TOD झोनचा नेमका फायदा होणार काय?
टीओडी झोन निश्चित केल्यामुळे मेट्रो स्थानकांच्या परिसरात अधिक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध बांधकामांना चालना मिळेल. यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, सार्वजनिक सुविधा आणि हरितक्षेत्रांची वाढ होईल. हा आराखडा तयार झाल्यानंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील अंमलबजावणी सुरू होईल.
शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले की,मेट्रो स्थानकांभोवती ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट झोन निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून पुढील नऊ महिन्यांत आराखडा तयार होईल. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर या आराखड्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल. एकंदरीत, या निर्णयामुळे मेट्रो परिसरातील शहरी विकासाला नवी दिशा मिळणार असून भविष्यात पिंपरी-चिंचवड शहर अधिक सुंदर, नीटनेटके आणि आधुनिक होईल अशी अपेक्षा आहे
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro News : पुण्यात मेट्रो स्थानकाच्या पाच मीटर परिसरात TOD झोन, नेमका प्लॅन काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement