Pune News : दिवाळीचं सोशल मिडियावर एक स्टेट्स अन् बसणार लाखोंचा गंडा, Scam आहे तरी काय?
Last Updated:
Home Security : दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाणाऱ्यांनी सोशल मिडियावर प्रवासाची माहिती शेअर करू नये, असा पोलिसांचा सल्ला आहे. अशा पोस्टमुळे घरफोडीची शक्यता वाढते.
पुणे : दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक लोक गावी जातात किंवा सहलीसाठी बाहेर पडतात. अशावेळी घर बंद ठेवून जाणाऱ्यांची संख्या वाढते आणि याच काळात चोरी किंवा घरफोडीच्या घटना अधिक घडतात. त्यामुळेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे.
अनेकांना सोशल मीडियावर गावी जातोय, ट्रिपवर निघालोय अशा पोस्ट, स्टेटस किंवा स्टोरी टाकण्याची सवय असते. पण लक्षात ठेवा, चोर सोशल मीडियावरही नजर ठेवतात. अशा पोस्ट पाहून ते घरात कोणी नसल्याची कल्पना करून चोरीचा डाव साधतात. त्यामुळे बाहेरगावी जाताना सोशल मीडियावर अशा गोष्टी शेअर करणे टाळा.
गावी जाण्यापूर्वी काय काळजी घ्याल?
घरातील सर्व दरवाजे, खिडक्या आणि ग्रील नीट बंद केल्याची खात्री करा. सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते व्यवस्थित कार्यरत आहेत का हे तपासा. शेजाऱ्यांना घर बंद ठेवून जात असल्याची माहिती द्या आणि त्यांनी लक्ष ठेवावे अशी विनंती करा. घरातील रोकड, दागिने, महत्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा.
advertisement
सोशल मीडियावरील सावधानता
प्रवासाचे फोटो, व्हिडिओ किंवा लोकेशन त्वरित सोशल मीडियावर टाकू नका. असे पोस्ट घर रिकामे असल्याचे संकेत देतात. फोटो किंवा व्हिडिओ शेअर करायचे असतील तर प्रवास संपल्यानंतर किंवा घरी परतल्यानंतरच करा.
पोलिसांची तयारी आणि नागरिकांचे सहकार्य
view commentsपोलिसांनी गस्त वाढवली असून रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगही सुरू आहे. तरी नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. घराजवळील सीसीटीव्ही कार्यरत ठेवावे आणि सुरक्षेची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 7:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : दिवाळीचं सोशल मिडियावर एक स्टेट्स अन् बसणार लाखोंचा गंडा, Scam आहे तरी काय?