पंतप्रधान मोदी दगडूशेठ गणपती चरणी लीन, कोणती केली पूजा पाहा Video

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले.

+
News18

News18

पुणे, 1 ऑगस्ट : देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना... असा 'भारत विश्वगुरु व्हावा' याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रस्टतर्फे दोन किलो वजनाची चांदीची गणरायाची मूर्ती, महावस्त्र, फळांची परडी आणि सुकामेवा देऊन नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने उपस्थित होते.
advertisement
लोकमान्य टिळक पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भव्य कमानी आणि मंडप घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा पथकाच्या वादनाने आणि ममता सकपाळ यांसह सुवासिनींनी औक्षण करून मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
advertisement
PM Modi Sharad Pawar : व्यासपीठावर पंतप्रधान मोदी पोहोचले थेट शरद पवारांकडे; केलं हस्तांदोलन, PHOTO VIRAL
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत भारत विश्वगुरु व्हावा याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला. याशिवाय पंचोपचार पूजा आणि महाआरती देखील झाली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मंदिराच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूने लावण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाच्या फलकांची पाहणी करीत त्यांनी विश्वस्तांकडून माहिती घेतली.
मराठी बातम्या/पुणे/
पंतप्रधान मोदी दगडूशेठ गणपती चरणी लीन, कोणती केली पूजा पाहा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement