IAS Puja Khedkar मॅडमची आई मनोरमा खेडकर अडचणीत, पोलिसांनी रायगडमधून घेतलं ताब्यात
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Manorama Khedkar : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकावलं होतं. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकावलं होतं. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांचा शोध घेतला जात होते. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी पोहचल्यानंतर पोलिसांनाही त्यांनी दमदाटी केली होती. शेवटी पौंड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं आहे.
मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गेल्या आठवड्याभरापासून पौंड पोलीस त्यांचा शोध घेत होते. महाड भागातून त्यांना ताब्यात घेतलं असून पौंड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल आहे. रायगडमधून पोलीस मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
advertisement
मुळशीत काय घडलं?
मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याला जेव्हा शेजारच्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले. या शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वरून दबाव आल्याने त्यांची तक्रार नोंदवली गेली नव्हती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2024 9:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
IAS Puja Khedkar मॅडमची आई मनोरमा खेडकर अडचणीत, पोलिसांनी रायगडमधून घेतलं ताब्यात