पुणे Porsche अपघात प्रकरण: लेकराला वाचवण्यासाठी दिले रक्ताचे नमुने, आईला अटक होणार?

Last Updated:

Pune Accident News : हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीम आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून त्याच्या जागी आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याची माहिती समोर आलीय.

News18
News18
वैभव सोनवणे, पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणाला (Pune Porsche Accident) धक्कादायक असं वळण लागलं आहे. रक्ताचे नमुने बदलल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. यात दोन डॉक्टरांना अटकही करण्यात आलीय. दरम्यान, आता रक्ताच्या नमुन्याबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. हिट अँड रन प्रकरणात (Pune Accident News) अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून त्याच्या जागी आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याची माहिती समोर आलीय. सुरुवातीला डॉक्टर श्रीहरी हरनोळ याने योग्य नमुने घेतले होते. मात्र फोन करून काहींनी दबाव टाकल्यानं रक्ताचे नमुने (Blood Samples) बदलले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) नेलं होतं. तिथं डॉक्टर श्रीहरी हरनोळने रक्ताचे योग्य नमुने घेतले होते. मात्र त्यानंतर रुग्णालयात आलेल्या दोन व्यक्तींकडून दबाव टाकला गेला. त्यामुळे हरनोळ याने सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन तीन रक्ताचे नमुने घेतले. यामध्ये एक नमुना अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांचे होते.  आता या प्रकरणी पुणे पोलीस शिवानी अग्रवाल यांचा शोध घेत आहेत.
advertisement
पुणे ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने हेराफेरी करणाऱ्या डॉक्टरांना लाखो रुपये पुरवणाऱ्य मकानदार नामक व्यक्तीचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. मकानदार यांनी मोठी आर्थिक रक्कम ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टर अजय तावरे याला दिली असल्याची माहिती समजते. ब्लड सॅम्पल प्रकरणात विशाल अग्रवाल याच्याकडून मकानदारने रक्कम डॉक्टर तावरे यांच्याकडे सुपूर्द केली. मकानदार पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ब्लड सॅम्पल हेराफेरी प्रकरणी मोटा उलगडा होण्याची शक्यता आहे. अजय तावरे याला दिलेल्या मोठ्या आर्थिक रकमेची मिळणार माहिती त्याच्याकडून मिळेल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे Porsche अपघात प्रकरण: लेकराला वाचवण्यासाठी दिले रक्ताचे नमुने, आईला अटक होणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement