पुण्यात या दिवशी ड्रोन, खासगी अवकाश उड्डाणांवर बंदी, काय आहे कारण?
- Reported by:Shivani Dhumal
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डानांना बंदी असणार आहे.
पुणे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पुणे दौरा यापूर्वी अतिमुसळदार पावसामुळे रद्द झाला होता. मात्र आता 3 सप्टेंबरला त्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबर रोजी सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद राहणार आहेत. तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खासगी अवकाश उड्डाणांना बंदी घालण्यात आलीये, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे.
3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत शाळा बंद असतील. तसेच पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डानांना बंदी असणार आहे. या बंदच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेतील नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा यापूर्वी 29 जुलैला राष्ट्रती द्रौपदी मुर्मू यांचा पुणे दौरा नियोजित होता. मात्र पुण्यात होत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे तो रद्द झाला होता. यावेळी द्रौपदी मुर्मू माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची ही भेट घेणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 30, 2024 9:02 AM IST









