पुण्यात हॉटेलमध्ये हायप्रोफाइल देहविक्री रॅकेट, विदेशी महिला पुरवल्या जायच्या, तिघींची सुटका
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Pune News: पुणे शहराच्या कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू परिसरात एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे शहराच्या कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू परिसरात एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवून ही मोठी कारवाई केली. या छापेमारीत एका विदेशी महिलेसह दोन परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली आहे, तर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडले.
परराज्यातील महिलांना फसवून पुण्यात आणलं
पोलिसांनी हॉटेलमध्ये टाकलेल्या छाप्यात एका विदेशी महिलेसह दोन परराज्यातील अशा एकूण तीन महिलांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य अनिलकुमार सिंह असे आहे.
advertisement
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं उघड झालं आहे की, आरोपी आदित्य सिंह हा परराज्यातील गरजू आणि गरीब कुटुंबातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होता. त्यांना पुण्यात आणून त्यांच्याकडून बळजबरीने हा वेश्याव्यवसाय करून घेत होता. आता या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? त्याला कुणी मदत करत होतं का? तसेच या रॅकेटमध्ये आरोपीनं आणखी काही महिलांना अडकवलं आहे का? याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 22, 2025 8:29 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात हॉटेलमध्ये हायप्रोफाइल देहविक्री रॅकेट, विदेशी महिला पुरवल्या जायच्या, तिघींची सुटका


