Pune News : धरणाच्या पाण्यावर उभारणार पूल, पुण्यातील हा पूल तयार होणार कसा? वाचा A टू Z माहिती

Last Updated:

Pune Flyove : पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोटावर 8 लेन उड्डाणपूल उभारणीला सुरुवात झाली आहे. संगारूण ते मालखेड गाव जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे वाहतुक सुधारेल.

News18
News18
पुणे : पुण्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खडकवासला धरणाच्या पाण्यावर पूल उभारला जाणार आहे, जो पुण्याच्या रिंग रोड प्रकल्पातील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या उड्डाणपूलामुळे सांगरूण ते मालखेड गाव जोडले जाणार आहे.
पाणलोट क्षेत्रामध्ये पाइल फाउंडेशन तंत्राचा वापर करून खड्डे खोदले जात आहेत आणि त्यावर खांब उभारले जात आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 267 खड्डे घेण्यात येणार आहेत, त्यापैकी 156 खड्डे जमिनीत तर 120 खड्डे पाण्यात उभारले जातील. आतापर्यंत पाण्यात 59 खड्डे उभारण्यात आले आहेत.
जाणून घ्या सविस्तर माहिती
उड्डाणपूलाची एकूण लांबी सुमारे 650 मीटर असून 8 पदरी रचना असणार असून पुलासाठी उभारले जाणारे खांब साधारण 40 ते 60 मीटर अंतरावर असतील. या प्रकल्पाचे काम नवयुगा कंपनीमार्फत सुरु असून एप्रिल महिन्यापासून काम चालू आहे. या पुलावरून रिंग रोडने प्रवास करणाऱ्या वाहनांना खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे सुंदर दृश्य अनुभवता येणार आहे.
advertisement
पुण्याच्या रिंग रोड प्रकल्पाचे महत्व फक्त वाहतूक कोंडी कमी करणे नाही तर सहा तालुकेतील 82 गावांना एकत्र जोडण्यातही मदत करणार आहे. पश्चिम आणि पूर्व असे दोन भागात विभागलेल्या रिंग रोडला अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च 55,622.33 कोटी रुपये आहे. यापैकी पश्चिम भागासाठी 22,536 कोटी, पूर्व भागासाठी 19,741 कोटी आणि पूर्व भागाच्या विस्तारासाठी 13,344 कोटी रुपये राखीव आहेत.
advertisement
एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी पश्चिम रिंग रोडच्या कामांची पाहणी केली असून, कामांना गती देण्याचे आदेश दिले आहेत. या उड्डाणपूलामुळे स्थानिक ग्रामस्थांना त्वरित फायदा होणार नाही, कारण हा मार्ग मुख्यतः द्रुतगती वाहतुकीसाठी तयार केला जात आहे, परंतु भविष्यात रिंग रोडवरून जाणाऱ्या सर्व वाहनांना या पुलावरून धरणाचे नयनरम्य दृश्य पाहता येईल.
advertisement
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अशा प्रकारचा मोठा प्रकल्प पुण्यात याआधी कधीही झाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प वैविध्यपूर्ण इंजिनीअरिंगचे उत्तम उदाहरण ठरणार आहे. पुल उभारणीसाठी स्टील, काँक्रिट किंवा लाकडापासून बनवलेल्या खांबांचा वापर करून मजबूत आणि टिकाऊ रचना तयार केली जात आहे. या पाणलोट प्रकल्पामुळे रिंग रोडचा प्रवास अधिक सुरळीत होणार आहे तसेच सहा तालुक्यांतील गावांना जोडण्यासही मदत होईल.
advertisement
या प्रकल्पामुळे पुण्याच्या रिंग रोडला आणखी महत्त्व मिळणार असून शहराच्या वाहतुकीच्या व्यवस्थापनातही मोठा बदल घडून येणार आहे. प्रवाशांना धरणाचे नयनरम्य दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे, तर भविष्यात या मार्गामुळे वाहतुकीची गती आणि सुरक्षितता दोन्ही वाढेल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : धरणाच्या पाण्यावर उभारणार पूल, पुण्यातील हा पूल तयार होणार कसा? वाचा A टू Z माहिती
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement