Bhiwandi Accident : एकुलता एक मुलगा गेला... दिवाळीआधी कुटुंबावर दु;खाचा डोंगर, 'राज' कधीच घरी येणार नाही

Last Updated:

Bhiwandi Accident News : भिवंडीतील खड्ड्यांमुळे 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याची बिकट अवस्था आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.

News18
News18
भिवंडी : भिवंडीतील खड्ड्यांनी पुन्हा एकदा तरुणाचे आयुष्य हिरावले आहे. भिवंडी-कल्याण मार्गावर घडलेल्या या भयावह अपघातात 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यांवरील उंचसखल काँक्रीट, पेवर ब्लॉक्स आणि खोल खड्ड्यांमुळे दुचाकीवरून जाताना हा अपघात झाला.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव राज सिंग असे असून राज हा आपल्या मित्रासोबत गुरुवारी पहाटे घराकडे जात होता. दरम्यान भिवंडी-कल्याण मार्गावरील टेमघर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ त्याची दुचाकी रस्त्याच्या खड्ड्यामध्ये अडकून घसरली. याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली तो चिरडला गेला. काही क्षणांपूर्वी हसत खेळत घराकडे निघालेला राज या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे एकदमच मृत्यूमुखी पडला.
advertisement
कुटुंबाचा आधार हरपला
राज हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. बी.कॉमच्या शिक्षण घेणार राज अचानकच आपल्या कुटुंबापासून दूर गेला. त्याच्या अचानक मृत्यूने कुटुंबावर आभाळ कोसळल्यासारखा अनुभव निर्माण केला. मित्रमंडळी, शेजारी आणि नागरिक या घटनेवर आत्ताच शोक व्यक्त करत आहेत, तर राजचा मित्र या भीषण अपघातातून बचावला गेला.
भिवंडीतील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. शहरात किंवा ग्रामीण भागात, सर्वत्र खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच वर्षातच भिवंडी शहर आणि आसपासच्या परिसरात खड्ड्यांमुळे तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला असून तरीही प्रशासन ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. राजच्या मृत्यूनंतर नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
advertisement
मयत कुटुंबाचा प्रशासनावर संताप
मृत राजचे वडील निरंजन सिंग यांनी आक्रोश व्यक्त करत म्हटले, आणखी किती बळी गेले पाहिजेत, प्रशासन जागं होईल का? माझा एकुलता मुलगा खड्ड्यांमुळे गेला. जर रस्त्यात खड्डा नसता, आज माझा मुलगा जिवंत असता. अशी घटना कोणाशीही घडू नये म्हणून प्रशासन तात्काळ निर्णय घ्यावा.
घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. त्यांनी सांगितले, रात्री दोनच्या सुमारास कंटेनर कल्याणच्या दिशेनं जात असताना दुचाकीस्वार साईबाबा मंदिराजवळील खड्ड्यात अडकला. याचवेळी कंटेनरच्या चाकाखाली तो चिरडला गेला. दुचाकीवर मागे बसलेला युवक जिवंत राहिला. कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Bhiwandi Accident : एकुलता एक मुलगा गेला... दिवाळीआधी कुटुंबावर दु;खाचा डोंगर, 'राज' कधीच घरी येणार नाही
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement