Pune Airport : पुणेकरांसाठी गुड न्यूज! विमानतळावर जाण्यासाठी आता लागणार नाही ट्रॅफिकचा 'ब्रेक'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे विमानतळावरून दररोज सुमारे दोनशे ते सव्वादोनशे उड्डाणे होतात आणि वार्षिक प्रवासी संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते.
पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (लोहगाव) ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांना वाहतूक कोंडीतून लवकरच दिलासा मिळणार आहे. नागपूर चाळ ते थेट विमानतळ प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता आता 12 मीटरवरून दुप्पट म्हणजे 24 मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. या कामासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा वापर केला जाणार आहे.
पुणे विमानतळावरून दररोज सुमारे दोनशे ते सव्वादोनशे उड्डाणे होतात आणि वार्षिक प्रवासी संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. प्रवाशांना बाराही महिने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
advertisement
या विकासामुळे पुणे शहराची ओळख, समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे पहिले आणि शेवटचे प्रतिबिंब प्रवाशांच्या मनात उमटेल. लवकरच या महत्त्वाकांक्षी रुंदीकरण आणि सुशोभीकरण कामाला सुरुवात होणार आहे. हा रस्ता पुण्याची नवी ओळख बनेल, असे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
भूसंपादनाचा मोठा अडथळा दूर
view commentsविमानतळ परिसरातील रस्ता प्रामुख्याने हवाई दलाच्या मालकीचा आणि काही खासगी मालकीचा आहे. हवाई दलाकडून जागा ताब्यात मिळण्यास दीर्घकाळ विलंब होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते. मात्र, आता हवाई दलाने नागपूर चाळ ते विमानतळपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाला हिरवी झेंडी दिली आहे. त्याचप्रमाणे खासगी जागा मालकांनीही भूसंपादनासाठी संमती दर्शवली आहे. यामुळे नागपूर चाळ ते लोहगाव विमानतळापर्यंतच्या तीन किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2025 10:13 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Airport : पुणेकरांसाठी गुड न्यूज! विमानतळावर जाण्यासाठी आता लागणार नाही ट्रॅफिकचा 'ब्रेक'










